मुथाळण्याच्या पागिरवाडीत राहते घर आगीत भस्मसात !

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील पागिरवाडी मुथाळणे येथील पोपट बंडू हळकुंडे यांचे राहते घर मंगळवार( दि. ३० ) रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास आगीत भस्मसात झाले .
विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे घराला आग लागल्याचे समजते आगीत गॅस टाकीचा स्पोट झाला. स्पोट इतका भीषण होता की, काही कळण्याच्या आत आगीने पूर्ण घर जळून खाक झाले.
हळकुंडे कुटुंब उन्हाळ्याचे दिवस असल्याने हळकुंडे कुटुंब घराच्या बाहेर अंगणात झोपलेले होते.घराला लागलेल्या आगीने . सर्व कुटुंब झोपेतून जागे झाले.तसेच शेजारी असलेले कुटुंबातील सदस्य काही वेळातच पागिरवाडी सर्व गाव घर विझवण्यासाठी मदतीला धावले .घरातील बांधलेली जनावरे या आगीतून अत्यंत शिताफीने बाहेर काढण्यात आली.
घराला लागलेली आग इतकी प्रचंड मोठी होती की,आगीत पूर्ण घर जळून खाक झाले. अकोले येथून अग्निशामक बंब बोलवण्यात आला.मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.महसूल विभागाचे तलाठी यांनीही सकाळी घटनेचा तात्काळ पंचनामा केला . शासकीय मदत जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल.मात्र माणुसकीच्या नात्याने हळकुंडे कुटुंबाला मदत करण्यासाठी वस्तू ,धान्य ,कपडे,रोख स्वरूपात मदत करावी.
पोपट बंडू हळकुंडे यांचे आई – वडील लांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे.त्यांचे मोठे भाऊ यांचेही एका दुर्धर आजाराने निधन झाले आहे.हळकुंडे कुटुंब आपली जिरायत शेती आणि मोलमजुरी करत उदरनिर्वाह करत आहे. आपल्याला जी शक्य होईल ती मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे