जगद्गुरू शंकराचार्य जयंती निमित्त संत पंढरी पिंपळगाव वाघा येथे वारी चे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी:_
गुरुवर्य कृष्णकृपंकित डॉ विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र पिंपळगाव वाघा येथे संत पंढरी निर्मितिचे काम सुरु आहे. अनेक मंदिरे आणी वारकरी शिक्षणासाठी गुरुकुल निर्मितीची संकल्पना डॉ मिसाळ महाराज यांची आहे.
आद्य जगाद्गुरू शंकराचार्य जयंती चे औचित्य साधून तिसऱ्या वर्षात 10/05/2023 ते 12/05/2023या काळात त्रिदिनी ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात डॉ मिसाळ महाराज, श्रीनिवास महाराज घुगे अशोक महाराज इदगे, मारोती महाराज तुणतुणे शास्त्री या नामवंत कीर्तनकारांची कीर्तन होणार आहेत.
गुरुवर्य कृष्णकृपंकित डॉ मिसाळ महाराज यांच्या अध्यक्षते खाली सामाजिक काम करत असलेल्या आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य वारकरी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा शंकराचार्य वारकरी भूषण पुरस्कार गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते हभप तुळशीराम महाराज सरकटे यांना. हभप छगन महाराज मालुसरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
संत पंढरीच्या या वारीला पारनेर, नगर, जुन्नर, राहुरी या तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रथम वर्षी 60-70, दुसऱ्या वर्षी 100-125 पायी दिंड्या आल्या असल्याची माहिती हभप डॉ मिसाळ महाराज यांनी दिली. तर या वर्षी 150-200 पायी दिंड्या याण्याची शक्यता महाराजांनी सांगितली.
हिंदू धर्मात, आणी धर्म संरक्षणात शंकराच्याऱ्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचे साहित्य विपुल प्रमाणात आहे. त्यांचे विचार समाजापर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम असल्याचेही महाराजांनी यावेळी सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संत पंढरीचे शेकडो संत सेवक काम करत आहेत.