इतर

आजचे पंचांग राशिभविष्य दि.१०/०९/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏

गौरी पूजन- विसर्जन

मंगळवारी १० सप्टेंबर रोजी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने ११ सप्टेंबरला बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने गुरुवारी १२ सप्टेंबरला रात्री ९:५३ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल. यावर्षी १७ सप्टेंबरला मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश
स्थापनेपासून अकरावा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीचे दिवशी विसर्जन केले जाते, त्यांच्याकडे अकरा दिवसांचा उत्सव असेल. तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणेबारा वाजताच संपत असली तरीही त्यानंतरदेखील विसर्जन करता येईल. विसर्जनाच्या वेळेस ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आरोळ्या देणाऱ्या आपल्या सर्वांच्या आग्रहाचा मान ठेवून पुढच्य
वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे २७ ऑगस्टला येणार आहेत.


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १९ शके १९४६
दिनांक :- १०/०९/२०२४,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३५,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति २३:१३,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २०:०४,
योग :- विष्कंभ समाप्ति २४:३१,
करण :- गरज समाप्ति १०:३८,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३० ते ०५:०२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:२६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२६ ते ०१:५८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३० ते ०५:०२ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
गौरी आवाहन २०:०४ प., मुक्त भरणव्रत, भद्रा २३:१३ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १९ शके १९४६
दिनांक = १०/०९/२०२४
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
आपली चिडचिड इतरांना दाखवू नका. संयम बाळगून वागा. नकारात्मक घटना फार मनावर घेऊ नका. कटू गोष्टी अनुकूल करण्याची कला शिकून घ्या. प्रिय व्यक्तीच्या भेटीचा योग.

वृषभ
धार्मिक ग्रंथांचे वाचन होईल. व्यवसायात नीतिचा मार्ग अवलंबा. आजचा दिवस समाधानकारक ठरेल. नवीन ओळखीतून प्रतिष्ठा लाभेल. अप्रिय व्यक्तींची भेट त्रासदायक ठरेल.

मिथुन
मित्र व नातेवाईकांशी सलोख्याने वागा. उगाच वाईटपणा घेऊ नका. मौल्यवान वस्तु जपाव्यात. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल. जुनी कामे मार्गी लावाल.

कर्क
नवीन कामाकडे लक्ष ठेवा. जे मिळेल ते पदरात पाडून घ्या. सन्मानात वाढ होईल. मुलांच्या जबाबदार्‍या व्यवस्थित पार पाडाल. कुटुंबातील सदस्य चांगली बातमी देतील.

सिंह
कौटुंबिक तिढा सोडवायला मदत कराल. मिळकतीचा नवीन स्त्रोत उत्पन्न होईल. एखाद्या कामासाठी अधिक धावपळ करावी लागेल. बोलण्यातून माधुर्य दर्शवाल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल.

कन्या
जुन्या आजारांवर वेळीच लक्ष द्या. कोणतीही गोष्ट पुढे ढकलू नका. धनसंचयात वाढ होईल. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित यश मिळेल. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल.

तूळ
आनंदाची अनुभूति घ्याल. कार्यालयीन वातावरण अनुकूल राहील. एखादा मोठा व्यवहार पार पडेल. घरातील लोकांचा आनंद द्विगुणित होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

वृश्चिक
वडिलोपार्जित धनाचा लाभ होईल. कोणत्याही संशयित कामात अडकू नका. पराक्रमात वाढ होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अधिक धावपळ झाल्याने आराम करण्यावर भर द्यावा.

धनू
जुन्या धार्मिक कथांचे श्रवण कराल. मन:शांती लाभेल. विरोधक माघार घेतील. एखाद्या व्यक्तीची भेट संस्मरणीय ठरेल. सासरच्या व्यक्तींकडून लाभ मिळेल.

मकर
दिवस आनंदात जाईल. जुनी सर्व कामे मार्गी लावाल. आर्थिक व्यवहारात यश येईल. जुने प्रयत्न फलद्रुप होतील. कार्यालयीन सदस्य कौतुक करतील.

कुंभ
मानसिक गुंतागुंतीत अडकू नका. विचारपूर्वक पाऊले उचला. निराशाजनक घटना दुर्लक्षित कराव्यात. अडचणीतून मार्ग निघेल. शक्यतो कोणत्याही वादात अडकू नका.

मीन
घरात नवीन वस्तूंची खरेदी केली जाईल. जुने परिचित लोक भेटतील. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवासात सावधगिरी बाळगणे हिताचे ठरेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button