लोकसभेला अकोल्यात 53 टक्के मतदान

अकोले प्रतिनिधी
शिर्डी लोकसभा मतदारसंघात सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले या मतदार संघातील 216 अकोले (अ.ज.)विधान सभा मतदार संघात
लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मशाल चिन्हावर भाऊसाहेब वाकचौरे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्हावर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे तर वंचित बहुजन आघाडीचे उत्कर्षा रुपवते (कुकर )असे एकूण 20 उमेदवार निवडणूक रिंगणात होते

ऐनवेळी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत वंचित कडून उत्कर्षा उपवते यांनी उमेदवारी केली वंचित च्या उमेदवारी ने निवडणूक तिरंगी भासविण्याचा प्रयत्न झाला मात्र खरी लढत एकनाथ शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे (धनुष्यबाण)आणि उद्धव ठाकरे सेनेचे भाऊसाहेब वाकचौरे (मशाल) यांच्यातच दुरंगी झाली अकोले शहरात वगळता उत्कर्षा रुपवते यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही यामुळे लोखंडे आणि वाकचौरे यांच्यात सरळ लढत झाली

यासाठी अकोले विधानसभा मतदार संघात आज सोमवारी १३ मे रोजी ३०७ मतदार केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान झाले . २ हजार मतदान कर्मचारी व अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली होती
विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे

आमदार डॉ किरण लहामटे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
एकूण 2,60,686 मतदारांपैकी सकाळी 11 वाजे पर्यंत अवघे 58,654 मतदारांनी (22.50टक्के) मतदान केले होते
तर दुपारी 1 वाजेपर्यंत 76, 387 मतदारांनी (29.30 टक्के) मतदान केले होते
दुपारी 3.00 वाजे पर्यंत एकूण पुरुष 1,36,898 पुरुष तर 1,23,787 स्त्री असे एकूण 2,60,686 मतदारांपैकीं 67,798पुरुष व 48,728 स्त्री आशा एकूण 1,16,527 मत दारांनी मतदान केले पुरुषांचे एकूण मतदान (49.52 टक्के) झाले स्रियांचे एकूण मतदान 39.36टक्के झाले तृतीय पंथीयांचे 100 टक्के मतदान झाले दुपारी 3 वाजे पर्यंत एकूण 44.70 टक्के मतदान झाले तर सायंकाळी 5 वाजे पर्यंत 1,40,510 (53.90टक्के ) मतदान झाले