इतर
ज्ञानोबांची वाणी , तुकोबांची बोली आणि शाहिरांची धारदार भाषाशैली ही महाराष्ट्राची ओळख– डॉ सुनील शिंदे

🗒 अकोले प्रतिनिधी
संत ज्ञानोबांची वाणी , संत तुकोबांची रोखठोक बोली आणि शाहिरांची कडाडती धारदार भाषाशैली ही महाराष्ट्राची ओळख जगभरात सर्वदूर पोचली’ असे प्रतिपादन डॉ . सुनील शिंदे यांचे प्रतिपादन .
‘ , याचना नव्हे ! ‘ असे प्रतिपादन डॉ . सुनील शिंदे यांनी केले . टेक्निकल कँपस् एम् . बी . ए . / एम् . सी. ए . च्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिन ऑनलाइन व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी टेक्निकल कँपस् चे डायरेक्टर डॉ . प्रशांत तांबे होते .
मायबोली मराठीची गौरवशाली परंपरा नजरेस आणताना डॉ . शिंदे पुढे म्हणाले , ' मराठी जशी शांत , सोज्वळ - मुलायम आहे तशीच ती तडाखेबंद , काळजाला भिडणारी संवादी आहे . ' भाषेचा थाट मराठी । अहिराणी कोंकणी घाटी । शत्रूला वाटते धास्ती । या पर्वतराजी कसल्या । कर्वतीच तापवलेल्या । परंपरा घेऊन मिरवतो । आमुचा मावळ तान्हा । ' अशा तेजस्वी भाषेत कॉम्रेड शाहीर अमरशेख बजावतात . ज्ञानोबा - तुकोबा , चोखोबा , जोतीबा फुले तात्या , ज्ञान माउली सावित्रीमाय , निसर्ग कन्या बहिणाबाई , साहित्य लक्ष्मी लक्ष्मीबाई टिळक , अण्णाभाऊ साठे अशा धुरिणांनी मायबोलीचा झेंडा अवघ्या विश्वात पोचवलाय . ' मायभूमी धीरांची । घामाची आणि श्रमाची । खुरप्याची आणि दोरीची । संतांची शाहिरांची । त्यागाच्या तलवारीची । स्मरुन धुरंधर त्या शिवराया । महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळुनी काया । ' अशी मायबोलीची अन् इथल्या भूमीची तगडी ओळखपाळख कॉम्रेड शाहीर अण्णा भाऊ साठे करुन देतात . मराठी अभिजात होती आणि आहे . तशी ती राहील हे सूर्यप्रकाशाइतपत स्वच्छ - स्पष्ट आहे . '
अध्यक्षीय समारोपात टेक्निकल कँपस् चे संचालक डॉ . प्रशांत तांबे यांनी राजभाषा मराठीचा गोडवा आणि कसदारपणा या मुद्द्यावर भाष्य केले . सूत्रसंचालन तसेच आभार प्रा . सागर वाकचौरे यांनी केले .
—————-……———–…….————