अकोल्यात क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मृतिदिन साजरा

अकोले प्रतिनिधी.
आज सोमवार दि 2 मे 2022 रोजी आदिवासी विचार मंच महाराष्ट्र राज्य व बिरसा ब्रिगेड . नोकरदार वर्ग अकोले आयोजित क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यात आले आदिवासी सांस्कृतिक भवन शिवाजीनगर ( धुमाळवाडी) येथे हा कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या प्रतिमचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अध्यक्ष मारुती लांघी , एच आर अस्वले , उपस्थित नोकरदार, महिला भगीणी, यांच्या हस्ते झाली. आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्याबद्दल एच आर अस्वले , सोमनाथ मुठे यांनी माहीती सांगीतली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मारुती लांघी यांनी आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांचे कार्य सांगीतले.
राघोजी भांगरे यांनी भीमाशंकर पायथ्यापासून ते वणी दिंडोरी त्र्यंबकेश्वर पायथ्यापर्यंत १ लाख २७ हजार हेक्टर जमीन इंग्रजांकडुन आदिवासींना मिळवून दिली. त्यांनी इंग्रजांविरूद्ध अनेक उठाव केले. अशा या महान क्रांतीकारकाला पकडून ठाणे येथील कारागृहात २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आली.त्यांच्या या शहिद स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित अध्यक्ष मारुती लांघी , अस्वले , शिवनाथ भोजने संतोष गोडे ,भोजने ,भरत लोहकरे ,प्रशांत गवारी ,खोकले सर,संजय दिघे सर व मॅडम, भास्कर दिघे सर व मॅडम, सोमनाथ मुठे सर व मॅडम, धर्मा दिघे सर व मॅडम,,भोजणे आजी,तसेच लहान मुलं मुली, आदिवासी विचार मंच व बिरसा ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मा दिघे यांनी केले व समारोप भास्कर दिघे स यांनी केला. —– —-