बालाजी देडगाव येथे सापडले मानवी देहाचे तुकडे ! घात पाताचा संशय

दत्तात्रय शिंदे
माका /प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील गावालगत असणारा पाथर्डी कॅनॉल मध्ये मानवी मृतदेहाचे ५ ते ६ तुकडे सापडले आहे. या घटनेमुळे देडगाव परिसरामध्ये खळबळ उडाली आहे
मानवी मृतदेहाचे पाय, मुंडके,मांडी असे अवशेष सापडले आहे. येत्या सहा महिन्यात अशी तिसरी घटना आहे यामुळे हि हत्या की घातपात अशी चर्चा सुरू आहे
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा मृतदेह चे तुकडे १० ते १५ दिवसापूर्वीचे असावे . त्यामुळे ते सडलेल्या अवस्थेत। आढळले . मृतदेहाचे मिळालेले तुकडे उत्तरीय तपासणी करिता पाठवण्यात येणार असून त्यानंतरच हे मानवी देहाचे तूकडे कोणाचे हे कळणार आहे
ही माहिती कळताच नेवासा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री वाघ ,पोलीस नाईक किरणपवार व संतोष खंडागळे, बबलू चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.