आंबीत धरणानंतर पिंपळगाव खांड धरण भरले

कोतुळ प्रतिनिधी
मुळा नंदी पाणलोट क्षेत्रात मान्सून सक्रिय झाल्याने अकोले तालुक्यातील आंबीत धरणा नंतर मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण आज गुरुवारी पहाटे भरले आहे पहाटे 5.30 वाजता पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो होऊन मुळा नदीचा पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेनं झेपावला आहे
मुळा नदी पाणलोट क्षेत्रात मंगळवार पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली बुधवारी रात्रभर सुरु असलेल्या संत त धार पावसाने मुळा नदीची आवक वाढली यामुळे 600 दल घ फु क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो झाले मुळा नदीच्या उगमा वर आंबीत येथे असणारे 193दशलक्ष घनफूट क्षमतेचे आंबीत धरण 27 मे 2025रोजी दुपारी 1 वाजता ओव्हर फ्लो झाले जिल्ह्यातील हे पहिले धरण भरले होते र्यानंतर आता पिंपळगाव खांड हे दुसरे धरण भरले आहे
मान्सून च्या दमदार बॅटिंग मुळे अकोले तालुक्यातील सह्याद्री च्या डोंगर रांगा आता ओल्या चिंब झाल्या आहे ओढे नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह वाढला पिंपळगाव खांड धरणात मोठी आवक झाली आजही पावसाचे सातत्य टिकून आहे
21376क्यूसेस पाण्याचा विसर्ग मुळा धरणाकडे झेपावला आहे मुळा नदीवर असणाऱ्या राहुरी तालुक्यातील 26 टी एम सी क्षमतेच्या मुळा धरणात आता आवक सुरू होणार आहे
अकोले तालुक्यातील आंबित धरणा नंतर आता पिंपळगाव खांड भरले यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे दुसरे धरण भरले आहे मुळा नदी वाहती झाल्याने संगमनेर- अकोले तालुक्यातील मुळा परिसरात आनंद व्यक्त होत आहे