ऊस तोडणी कामगारांचे मोबाईल चोरणारा चोरटा गजाआड!

ऊस तोडणी कामगारांचे मोबाईल चोरणारा चोरटा गजाआड!
नेवासा प्रतिनिधी
नेवासा तालुक्यात बेल पिंपळगाव शिवारात ऊस तोडणी कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला नेवासा पोलिसांनी गजाआड केले
याबाबत अकाश सुपलु राठोड रा-बेल पिंपळगाव ता-नेवासा यांनी फिर्याद दिली कि- बेल पिंपळगाव शिवरात उस तोडणीकरीता इतर परिवारासह आलेलो. असुन दि-०२.०१.२०२२ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने आमचे कोपीवरील राहणारे लोकांचे सुमारे १४,०००/- रुपये किंमतीचे ०३ मोबाईल चोरुन नेले आहेत.
नेवासा पोलीस स्टेशन गुरनं- १२/२०२२ भादवी-३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास
पो ना बबन तमनर हे करत आहेत.
गुन्ह्यात चोरीस गेले मोबाईलचा अप्पर पोलीस अधिक्षक सो श्रीरामपुर यांचेकडील सायबर टीमच्या मदतीने माहीती प्राप्त करुन पुराव्याच्या आधारे तपास करुन आरोपी समिर भाउसाहेब भोसले वय-२० वर्षे रा-मुकिंदपुर ता-नेवासा यास अटक करण्यात आली असुन त्याच्या कडुन एक बिगर नंबरची पल्सर मोटार सायकल तसेच गुन्ह्यात चोरीस गेले तीन मोबाईल जप्त करण्यात आले असुन आरोपी कडुनआणखी अशाप्रकारचे गुन्ह उघड होण्याची दाट शक्यता आहे.
सदरची कामगीरी ही मा पोलीस अधिक्षक मनोज पाटील अहमदनगर, मा अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल , अहमदनगर, मा अपर पोलीस अधिक्षक सो दिपाली काळे
श्रीरामपुर, मा उप विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे शेवगाव, पो निरी बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोसई समाधान भाटेवाल, पोना/बबन तमनर, पोना/अशोक कुदळे, पोकॉ/अंबादास गिते, पोकॉ/केवल रजपुत, पोकॉ/योगेश आव्हाड तसेच अपर पोलीस श्रीरामपुर यांचे सायबर टीमचे पोना फुरकान शेख, प्रमोद जाधव यांनी केली आहे