नर्मदेश्वर मंदिर वर्धापन दिना निमित्त नेप्तीत कीर्तन महोत्सव!

अहिल्यानगर :- नगर तालुक्यातील नेप्ती येथील नंदनवन फार्म येथे जाधव परिवाराकडून बांधण्यात आलेल्या श्री.नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त नर्मदेश्वर मित्र मंडळ ,सरस्वती हॉस्पिटल ,नंदनवन मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळ्याचे महाप्रसादाचे व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रामदास फुले यांनी दिली.
महंत योगी संगमनाथजी महाराज विशाल गणपती मंदिर अहिल्यानगर व वेदशास्त्र संपन्न बाळकृष्णदेवा पंढरपूरकर व गंगानाथ महाराज गुरुगंडानाथ यांच्या उपस्थित हे कार्यक्रम होणार आहेत .
नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि.२६ मार्च रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळात हरिपाठ व महाआरती तसेच रात्री ९ ते११ या वेळात ह.भ.प .संजय महाराज महापुरे कामरगाव यांचे कीर्तन होईल. गुरुवार दि. २७ मार्च रोजी सकाळी १० वा. ह .भ .प. गुलाब महाराज खालकर आर्वी ता. जुन्नर यांचे कीर्तन होईल .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा असे आव्हान नर्मदेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब जाधव व माजी सभापती सुवर्णाताई दत्ता जाधव यांनी केले आहे.