आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२६/०२/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन ०७ शके १९४६
दिनांक :- २६/०२/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३३,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति ११:०९,
नक्षत्र :- श्रवण समाप्ति ११:०९,
योग :- परिघ समाप्ति २६:५७,
करण :- विष्टि समाप्ति २२:०६,
चंद्र राशि :- मकर,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – शततारा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- त्रयोदशी वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:४२ ते ०२:१० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:५१ ते ०८:१९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०८:१९ ते ०९:४७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:१४ ते १२:४२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०५ ते ०६:३३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
महाशिवरात्रीला, शिवपूजन(मध्यरात्री २४:२७ ते २५:१६), भद्रा ११:०९ नं. २२:०६ प., चतुर्दशी श्राद्ध,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन ०७ शके १९४६
दिनांक = २६/०२/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
नवीन मित्र जोडले जातील. आपला दबदबा निर्माण कराल. इतरांना मदत करण्याचा आनंद घ्याल. सर्वांशी आपलेपणाने वागाल.
वृषभ
कुटुंबात तुमचे वर्चस्व राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जाईल. विषयाला उगाचच फाटे फोडू नका. उष्णतेचे त्रास संभवतात.
मिथुन
जवळचा प्रवास आनंददायी होईल. भावंडांशी सलोखा वाढेल. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. विचारात एकसूत्रता आणावी लागेल. एकाच वेळी ढीगभर कामे अंगावर घेऊ नका.
कर्क
कौटुंबिक वातावरण हसते खेळते असेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. घरगुती वाता वरणात गुंग व्हाल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.
सिंह
तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांची काळजी लागून राहील. लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील.
कन्या
अति विचार करत बसू नका. कामाच्या ठिकाणी कुशाग्र बुद्धीचा वापर कराल. घरात काही बदल करावे लागतील. कामातून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. स्थावरचे प्रश्न सोडवावेत.
तूळ
कर्तबगारीला चांगला वाव मिळेल. तुमच्यातील महत्वाकांक्षा वाढीस लागेल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. हाता पायास किरकोळ इजा संभवते.
वृश्चिक
पैशांची उधळपट्टी टाळावे. कुटुंबात आपले वर्चस्व गाजवाल कर्तृत्व दाखवण्याची संधि सोडू नका. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवावेत. रागावर नियंत्रण ठेवावे.
धनू
क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. वडिलोपार्जित कामे निघतील. आपली बुद्धिमत्ता दाखवण्याची संधि मिळेल. परोपकाराची जाणीव ठेवाल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल.
मकर
शांत व संयमी विचार करावा. कौटुंबिक खर्चाचा पुनर्विचार करावा लागेल. बोलण्याच्या भारात जबाबदारी घेण्याचे टाळावे. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. सामुदायिक वादात सहभाग घेऊ नये.
कुंभ
बौद्धिक ताण राहील. कामाचा वाढता व्याप लक्षात घ्यावा. वडीलधार्यांचा सन्मान करावा. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. हातातील कलेसाठी वेळ काढावा.
मीन
कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांची मदत घेता येईल. सहकार्यांच्या साथीत रमून जाल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर