वारंघुशी येथे बालसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील वारंघुशी येथे स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी येथील गुरुवर्य ह.भ.प.विजय महाराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आजी-माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या बालसंस्कार शिबिराचा समारोप अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वारंघुशी येथे हे बालसंस्कार शिबिर राबविण्यात आला होते.या शिबिरासाठी मोलाचे सहकार्य म्हणून मधुकररावजी पिचड (माझी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य), हेमलताताई पिचड (आदर्श माझी सरपंच ग्रामपंचायत राजूर),वैभवभाऊ पिचड (माझी सदस्य विधानसभा महाराष्ट्र राज्य,चेअरमन अमृतसागर दूध संघ अकोले) व संस्थेचे सर्व बाल कीर्तनकार वारकरी मंडळी यांनी केले.
गुरुवर्य ह.भ.प. विजय बाबा चव्हाण,गुरुवर्य ह.भ.प.देवराम महाराज इदे,गुरुवर्य ह.भ.प. गोविंद महाराज तिखांडके,यांनी मार्गदर्शन केल उन्हाळ्यातील सुट्टीचा सदुपयोग व्हावा याकरिता बाल संस्कार शिबिर आयोजित केले होते.आज आपण आपल्या समाजाकडे पाहिले तर अनेक तरुण व्यसनाधीन झालेले आहेत.दारू, गांजा, गुटखा, सिगारेट,तंबाखू, अशा प्रकारची अनेक व्यसन तरुणांना लागली आहेत.पावलावर पाऊल ठेवून लहान मुले ही बिघडले जातात. चोरी, लुटमार,भांडणे,यांचे प्रमाण वाढत आहे.अजूनही उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. ज्या आई-वडिलांनी लहानाचे मोठे केले त्याच आई-वडिलांना म्हातारपणी मुलं घराबाहेर काढतात. राष्ट्रसेवा, समाजसेवा,निसर्ग सेवा,याकडे दुर्लक्ष केले जाते.या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व सुसंस्कारित पिढी निर्माण करण्यासाठी हे बाल संस्कार शिबिर राबविण्यात आले होते.
या शिबिरात मृदुंग,तबला, हार्मोनियम,वारकरी गायन चाली,टाळ,कीर्तन, प्रवचन,रामायण,बाल संस्कार, योगासने,हरिपाठ,गीता संहिता,व व्याख्याने, किर्तन महोत्सव आयोजित केले होते.दोनशे ते अडीचशे मुले या शिबिरात सहभागी झाले होते.
यावेळी इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वारंघुशी येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद,भरत घाणे (अध्यक्ष आदिवासी उन्नती मंडळ राजुर),अनंत घाणे (समाजसेवक),फसाबाई बांडे (सरपंच वारंघुशी), समीर मुठे (उपसरपंच),व गावातील सर्व भजनी मंडळ,तरुण मित्र मंडळ, व ग्रामस्थ गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराचा समारोप ह.भ.प.विजय महाराज चव्हाण (अध्यक्ष स्वानंद वारकरी शिक्षण संस्था बलायदुरी) यांनी काल्याच्या कीर्तनातून शिबिराचे सांगता केली. व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.