खेड्यातल्या मुला-मुलींमध्येही उच्च कोटीची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता असते -शकु अक्का

विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी-
खेड्यातल्या मुला-मुलींमध्येही उच्च कोटीची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता असते केवळ प्रतीकुल परिस्थितीमुळे जर त्यांना शिक्षण आणि त्यातही दर्जेदार शिक्षण मिळाले नाही तर लहानL वयात त्यांच्या प्रतिभेचे अंकुर खुडले जातात. त्यांचा विकास कुंठीत होतो. दारिद्र्य त्यांच्या गुणवत्तेला फुलू देत नाही. ही केवळ त्या व्यक्तीची आणि त्या कुटुंबाची हानी नसते. तर ती आपल्या संपूर्ण समाजाची व राष्ट्राची हानी असते असे विचार .आदिवासी विकास विभागाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या समन्वयक श्रीमती. शकु अक्का यांनी मांडले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्था नाशिक व आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय व्यवस्थापन समिती प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसी संवाद साधण्याचा कार्यक्रम शनिवार (दि.13 एप्रिल )रोजी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा जवळे बाळेश्वर ता. संगमनेर येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती सुनिता करवंदे या होत्या.तर श्री.विठ्ठल डामसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शकु अक्का पुढे म्हणाल्या की,जे वंचित राहिलेले आहेत. त्यांना चांगल्या संधी प्राप्त करून देण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदतीचा हात दिला पाहिजे.मुला-मुलींपर्यत विविध संधी पोचवण्यासाठी आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. ज्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्या निरक्षर होत्या,त्यांची मुलं आणि नातवंड आता आकाशाला भिडण्याइतकी उतुंग झेप घेऊ लागली आहेत.त्यामुळे आसवांच्या ठिणग्यांचं चांदणं करण्याचं अफाट सामर्थ्य शिक्षकात आहे असे विचार श्रीमती शकु अक्कांनी मांडले.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समितीचे सशक्तीकरण लोकाभिमुखता या व्यापक उद्दिष्टांन्वये सदर संस्था काम करत असुन शासन व आश्रमशाळा यातील दुवा सांधन्याचे काम शकू अक्का करत आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठलराव डामसे, उपाध्यक्षा श्रीम. सुनिताताई करवंदे,सदस्यां निलीमा कौठे,जिजा परते, व इतर सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमात ऊपस्थितांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार यांनी केला.त्यानंतर शकू आक्का यांनी विद्यार्थ्यांसी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या जाणुन घेतल्या, त्याचं घरचं वातावरण,परिस्थिती घरात कोण-कोण शिकलेले आहेत, पालकांचा व्यवसाय,आर्थिक परिस्थिती या सर्व गोष्टींना स्पर्श करुन मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना बोलते केले. विद्यार्थ्यांशी जवळीक साधत असताना शकू अक्कांच्या बोलण्यामुळे विद्यार्थ्यांच्या ओठावर समाधानाचे हास्य दिसत होते.शकु अक्का यांनी महाराष्ट्रातील विविध आश्रम शाळेतील व आदिवासी जनजातीतील विविध विद्यार्थ्यांशी संवादच्या आठवणी उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितल्या व शिक्षणाचे महत्व विशद केले.महाराष्ट्रातील विविध आश्रम शाळेतील उपक्रमांची माहिती मुलांना दिली.
कार्यक्रमात श्रीमती आवारी, पवार, किशोर शिंदे,श्रीनिवास सुर्यवंशी,नितीन पायके,श्रीम.अश्विनी शिंदे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.दिलीप धांडोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.आदिनाथ सुतार यांनी केले. शेवटी श्रीमती.सुरेखा नाईकवाडी यांनी आभार मांनले.