पारनेर तालुक्यातील ऋषिकेश कोकाटेची महसूल सहाय्यक पदी निवड

पारनेर :-पारनेर तालुक्यातील वारणवाडी या खेडेगावातील पोखरी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब रंगनाथ कोकाटे यांचे सुपुत्र ऋषिकेश कोकाटे याची राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र शासन महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील ऋषिकेशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. खडतर परिश्रम, मेहनत करत महागड्या शिकवण्या न लावता पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी उत्तीर्ण झाल्याने सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.
ऋषिकेश कोकाटेचे नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब, पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार काशिनाथ दाते सर, जिल्हा परिषदचे मा.उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील, मा.सभापती गंगारामशेठ बेलकर,सुभाष झिझांड (अभियंता पाटबंधारे विभाग,कुकडी),सरपंच संजय काशीद,अरुण बेलकर,उत्तम कोकाटे,बाळासाहेब डोंगरे,ज्ञानदेव ढेंबरे,वैभव लंके,मंगेश दाते,पांडुरंग गागरे यांनी निवडीचे स्वागत व अभिनंदन केले .