अकोल्यात घाट माथ्यावर मान्सुन ची चाहूल

अकोले/प्रतिनिधी –
गेल्या काही दिवसांपासून मान्सून कधी सुरू होईल याची वाट शेतकरी बघत आहे. गेल्या वर्षी मान्सून उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.यामुळे यावर्षी पाऊस वेळेत सुरू होईल की नाही यावरून शेतकरी चिंतेत आहेत.गेल्या आठ दिवसांपासून मोसमी वादळी वाऱ्याचे प्रमाण वाढले आहे.आता मागे काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर काही ठिकाणी मोसमी वारे वाहू लागले तीन चार दिवसांपासून सह्याद्रीची रांग असलेल्या कळसुबाई हरिश्चंद्रगड,बितानगड,
महाकाळेश्वरचा डोंगर,पट्टाकिल्ला,या परिसरात डोंगरावरून धुक्याची चादर पसरली आहे.व नैऋत्य मोसमी वाऱ्याचे प्रमाण वाढू लागले आहे.एकदरे परीसरात दररोज सकाळी सकाळी सह्याद्रीची पर्वत रांग असलेल्या महाकाळाच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात धुक येण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात खूप मोठा आनंद झाला आहे. गेल्या वर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठी नाराजी व्यक्त झाली होती.मात्र यावर्षी ३० मे २०२४ रोजी केरळ आणि ईशान्य भारताच्या बहुतांश भागामध्ये प्रवेश केला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो महाराष्ट्रात पुढील १० ते १५ दिवसात दाखल होइल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेली लोक आता पावसाच्या प्रतीक्षेत होते.त्यातच मान्सूनच्या बातमीने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.पाऊसाने बऱ्यापैकी सुरूवाद केल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची शेतीकामासाठी लगबग सुरू झाली आहे.