अकोले महाविद्यालयास वैभव प्राप्त करून देण्यास प्राचार्य स्व.व्ही.पी.मोरे यांचे योगदान!

अकोले प्रतिनिधी-
अकोले महाविद्यालयाच्या उभारणी पासून महाविद्यालयास वैभव प्राप्त करून देणारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य स्व.व्ही.पी.मोरे सर यांचे योगदान संस्था कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे यांनी केले.
अगस्ति महाविद्यालयाचे माजी प्राचार्य स्व. विठ्ठल पांडुरंग मोरे सर यांचे 11 व्या पुण्यस्मरण निमित्ताने संस्थेचे उपाध्यक्ष मधुकरराव सोनवणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर शेळके , शिक्षणाधिकारी एस.पी. मालुंजकर ,प्रा.टी.एस.जाधव ,प्रा.एस.बी.काळे , जाधव बी.बी., प्रा.गणेश भांगरे ,प्रा.संतोष गावंडे यांनी आदरांजली वाहिली .त्यावेळी मधुकरराव सोनवणे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,स्व.प्राचार्य मोरे यांनी आपल्या सेवेतील सर्व आयुष्य अकोले महाविद्यालयाच्या प्रतिकुल परिस्थिती त शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व भौतिक विकासासाठी अनमोल योगदान दिलेले आहे.परिस्थिती अभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असा त्यांचा नेहमी प्रयत्न असायचा.त्यांचा आदर्श इतरांनाही घ्यावा असे गौरवदगार काढले..
त्यांच्या योगदानाबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीने त्यांचे मोठे तैलचित्र लावून गौरव केला असल्याचे श्री सोनवणे म्हणाले. यावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.