
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आमदार मोनिकाताई राजळे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार राजीवजी राजळे मित्र मंडळ शेवगावच्या वतीने न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमासाठी सिने अभिनेता क्रांती नाना माळेगावकर तसेच बालगायिका टीव्ही स्टार सह्याद्री माळेगावकर स्वतः उपस्थित राहून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत, करिता शेवगाव शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घ्यावा असे माजी आमदार राजीव राजळे मित्र मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
शेवगावमध्ये गणेशोत्सव 2023 निमित्ताने गृहिणी, माता-भगिनींना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आनंदाचे क्षण मिळावेत याकरिता शनिवार दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी लक्ष्मीनारायण मंगलकार्यालय आखेगाव रोड, शेवगाव येथे दुपारी 4 ते सायं. 7 वाजेपर्यंत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा राज्यभर नावाजलेला कार्यक्रम शेवगाव शहरात प्रथमच आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यासाठी व्हर्लपूल फ्रिज व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी सॅमसंग वॉशिंग मशीन व मानाची पैठणी, तर तृतीय क्रमांकासाठी आयवा कंपनीचा एलईडी 32 इंची टीव्ही व मानाची पैठणी बक्षीस आयोजकांनी जाहीर केले आहे तसेच 50 उत्कृष्ट सहभागी खेळाडूंना आकर्षक पैठणी भेट व प्रश्नमंजुषा बक्षीस चांदीचे नाणे व नोंदणीकृत 10 महिलांसाठी लकी ड्रॉ पद्धतीने आकर्षक पैठणी देण्यात येणार असल्याचे माजी आमदार राजीव राजळे मित्र मंडळ शेवगाव चे वतीने सांगण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात गप्पागोष्टी, रंजक खेळ, उखाणे, गीत, नृत्य, विनोद अशी भक्कम मेजवानी असणार आहे. आयोजकांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली असून जास्तीत जास्त महिला भगिनींनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.