सोलापूरला 10,वी 12 वी, तील गुणवंताचा होणार गुणगौरव सोहळा

सोलापूर : सोलापूरातील पद्मशाली समाजातील 10 आणि 12 वीत 80 %पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव, व पद्मशाली फौंडेशन तर्फे वह्या देउन करण्यात येणार आहे.
10 वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला ‘पद्म-ज्योती’ आणि ‘पद्म-एकलव्य’ पुरस्कार श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे. सदरचे पुरस्कार सोलापूरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त सदस्य श्री. श्रीधर व्यंकप्पा सुरा यांच्या तर्फे देण्यात येईल. तसेच ‘सारथी स्पोकन इंग्लिश कोर्स’च्या संचालिका सौ. विणा विठ्ठल वंगा यांच्या वतीने सोलापूर जिल्हा – शहरात १० वीत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या पद्मशाली समाजातील ३ विद्यार्थ्यांना 3 महिन्यांचे मोफतपणे स्पोकन इंग्लिश कोर्स शिकवले जाईल.
विशेष सन्मान –
अडचणीमुळे अर्धवट शिक्षण सोडून काही वर्षे झाल्यानंतरही (किमान गॅप५-६ वर्षे) पुन्हा शिक्षणाची ओढ वाढून यंदाच्या १०-१२वीत परिक्षा देउन उत्तीर्ण झालेल्या पद्मशाली समाजातील विद्यार्थी – विद्यार्थींनींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यासाठी 9021551431 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावेत.)
रविवार, दि. २३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता जुना अक्कलकोट नाका (गांधीनगर) कमला बँक पाठीमागील श्री. श्रीनिवास बुरा सरांचे ‘प्रिसीजन इंग्लिश मेडियम स्कूल’ येथे आयोजन केले आहे. विद्यार्थी, पालक किंवा त्यांच्या नातेवाईक असलेल्या कोणीही 80 % व त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रिकेची झेरॉक्सप्रत भद्रावती पेठ येथील श्री साईदरबार मंदिर मागील ‘वर्षा रबर स्टॅम्प’ येथे दि.२० जून पर्यंत जमा करावीत.
[ विशेष सूचना : आमच्याकडे आलेल्या गुणपत्रिकेनुसार ‘प्रथम क्रमांक निवड’ करुन पुरस्कार दिले जाईल.]