पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ताळ्यावर आणण्यासाठी “भव्य जागरण गोंधळ आंदोलन”

दत्ता ठुबे
पुणे -केवळ पैशाला प्राधान्य देऊन, गरीब रुग्णांवर उपचार नाकारणाऱ्या पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील
हॉस्पिटलला ताळ्यावर आणण्यासाठी लोकशाही संविधानिक मार्गाने….!”
“भव्य जागरण गोंधळ आंदोलन” करण्यात येणार आहे
रुग्ण डॉक्टरांचे संरक्षण व रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी ‘आयएसओ मानांकित संघटना असणाऱ्या परिसर रुग्ण हक्क परिषद चे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी या अनोखे आंदोलनाचा इशारा दिला आहे
रुग्ण हक्क परिषद पिंपरी चिंचवड शहर कमिटी, पुणे शहर कमिटी, पुणे जिल्हा कमिटी चे वतीने डी. वाय. पाटील, हॉस्पिटल पिंपरी, पुणे येथे
-: गुरुवार दिनांक 20 जून 2024 रोजी,
सकाळी ठीक 11:00 वाजता.हे आंदोलन होणार आहे
मागासवर्गीय तरुण महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनाने 50 लाख रुपये मंजूर केले,
ही बाब खरी आहे का? याचा जाब विचारण्यासाठी….!
पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये गेल्या सहा महिन्यात फुफ्फुस ट्रान्सप्लांट ऑपरेशन झाले की नाही?
झाले असतील तर किती झाले आहेत? याची विचारणा करण्यासाठी….!
तरुण महिला पोलीस शिपाई कर्मचाऱ्यास फुफ्फुस उपलब्ध झाले आहे, असे सांगून चार वेळा ऍडमिट करून घेतले आणि 50 लाख रुपये नाहीत म्हणून चार वेळा परत पाठवून दिल्याच्या चार धक्कादायक घटना डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये घडलेल्या आहेत….!
पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा राज्य पोलीस महासंचालक कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागावर विश्वास आहे की नाही? याचा जाहीर खुलासा या आंदोलनात मागण्यात येणार आहे