कातळवेढा या ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवले जात आहे.
पारनेर तालुक्यातील कातळवेढा या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवा पोहोचविणे हे प्रामुख्याने उद्देश आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आपल्या पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत रुग्णसेवा पोचली पाहिजे यासाठी यापुढील काळात काम करत राहणार आहे. नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दृष्टी देण्याचा प्रयत्न करत राहणार असल्याचे डॉ. श्रीकांत पठारे मनाली तसेच ते पुढे बोलताना म्हणाले शिवसेना हा पक्ष ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करतो या तत्त्वाला धरून या पुढील काळात तालुक्यात काम करत राहणार आहे. तसेच यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. पठारे यांनी शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांच्या समवेत कातळवेढा गावचे सरपंच पियुष गाजरे, अजित भाईक, मोहित जाधव, अक्षय फापाळे, प्रशांत निंबाळकर, महेश गुंजाळ, सचिन पवार, विलास भाईक, यशवंत पवार, भाऊ गुंड, दत्तात्रय गाजरे, बाबाजी भाईक, उत्तम भाईक, प्रमोद गाजरे, गेनूभाऊ भाईक, सोपान गाजरे, नारायण वाघ, दिनेश वाघ, दत्ता भाईक, रघुनाथ गुंड, रघुनाथ भाईक, ज्ञानदेव गुंड, रखमा गुंड, बबन गुंड, बाळू दरेकर, सुभाष गुंड, सुमन गाजरे रेउबाई भाईक, चंद्रभागा भाईक, भाऊसाहेब पवार, युवराज गाजरे, आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. कातळवेढा या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिरामध्ये १०० पेक्षा जास्त रुग्णांनी लाभ घेतला.
डॉ. श्रीकांत पठारे यांनी सावरगाव, नांदूर पठार, काकणेवाडी, कासारे, डोंगरवाडी या ठिकाणी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे घेतली आहेत. या शिबिराचा अनेक लोकांना फायदा होत आहे. यावेळी डॉ. श्रीकांत पठारे यांचा कातळवेढा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला. डॉ. पठारे हे सर्वसामान्यांची सेवा करणारे नेतृत्व म्हणून तालुक्यात पुढे येत आहे.