
कोतूळ/प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष रामनाथ भोजने यांना नुकताच वृक्षमित्र पुरस्कार 2024 देऊन सन्मानित करण्यात आले
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राळेगण सिद्धी (पारनेर) येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते
श्री भोजने यांनी अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरं परिसर व हरिश्चंद्र गड परिसर व भोजनेवाडी ,अबितखिंड या परिसरात पर्यावरणाचे संतुलन, संरक्षण, आणि वृक्षारोपनाचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू केले . असून भविष्यात ते एक मूल एक वृक्ष , एक शेतकरी एक वृक्ष असा उपक्रम राबवून अबितखिंड गाव हे वृक्ष वल्ली करणार आहेत म्हणून भोजने यांना पद्मश्री डॉ. अण्णा हजारे व श्री. प्रमोद दादा मोरे ( अध्यक्ष निसर्ग व पर्यावरण महामंडळ) यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला .
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे व पद्मश्री मा.गिरीश प्रभुणे , व निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष श्री प्रमोद दादा मोरे ,उपाध्यक्ष सौ छायाताई रजपूत व मंडळाच्या सचिव सौ वनश्रीताई व श्री पर्यावरण मंडळाचे राज्य संघटक डॉ.व्ही.व्ही.पोपेरे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम संपन्न झाला