एकदरे येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी-
नियमित योगसाधनेने निरोगी राहूयात व संगित ऐकून आयुष्यात रंग भरूयात याप्रमाणे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकदरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. २१ जून हा दिवस संपूर्ण विश्व भारत योग दिवस म्हणून साजरा केला जातो. निरोगी शरीर तसेच स्वस्थ म्हणा साठी योग अतिशय आवश्यक आहे.यावेळी लहान मुलांपासून ते अभालवृद्धांनी देखील योगाचा आनंद घेतला.
सरपंच योगेश भांगरे यांनी सांगितले की, दररोज योग केल्याने शरीराला ऊर्जा तसेच मनाला शांती मिळते.सन २०१५ पासून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.भारतीय संस्कृतीमध्ये योगाला खूप महत्त्व दिले जाते.
यावेळी आरोग्य कर्मचारी बाळासाहेब यादव यांनी हा दिवस योगाच्या महत्त्वाचे स्मरण करून देतो आणि योगाच्या शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक फायद्याचे जागरूकता वाढवतो.योग ही एक प्राचीन शारीरिक मानसिक आणि अध्यात्मिक प्रथा असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी उपस्थित योगेश भांगरे सरपंच एकदरे,माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख भांगरे, जिल्हा परिषद शाळेचे भोरू मेंगाळ सर,आरोग्य कर्मचारी बाळासाहेब यादव,सुमन खळेकर आरोग्य कर्मचारी, तसेच भास्कर भांगरे, तानाजी मुठे,निवृत्ती भांगरे,वाळू भांगरे,विद्यार्थी व पालकवर्ग, गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक भोरू मेंगाळ यांनी योगाचे प्रात्यक्षिक दाखविले.