सोलापूरात श्री सिध्दरामेश्वरांची ‘लहाननंदीध्वज’ आता घरांघरांत…!

.
पद्मशाली सखी संघम आणि
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम..
सोलापूर – सबंध महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या सोलापूर शहरात जानेवारी महिन्यात होणा-या ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांची गड्डा यात्रा आणि धार्मिक विधी पाहण्यासाठी अनेक राज्यांमधून भक्त येत असतात. यात्रेमध्ये प्रामुख्याने आकर्षण असणा-या ‘नंदीध्वज’ पाहण्यासाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आधी राज्यांतून सहकुटुंब येत असतात. यामध्ये मोठ्यांसह लहान मुलांसाठी आकर्षण वाटणा-या लहान ‘नंदीध्वज’ तयार करण्याचे प्रशिक्षण सोमवार, १८ डिसेंबर रोजी आयोजित केल्याची माहिती पद्मशाली सखी संघमच्या अध्यक्षा ममता मुदगुंडी व सचिवा ॲड. रेखा गोटीपामूल यांनी दिल्या आहेत.
अक्कलकोट रोड वरील एमआयडीसी शेवट असलेल्या सुनील नगर भागातील अरुण प्राथमिक शाळा व कै. लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला येथे सोमवारी सकाळी अकरा वाजता सुरवात होईल. मतिमंद, गतिमंद आणि इतर मुलांना टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू, विविध ‘कला अवघत’ करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी धडपडणा-या ‘ऑल इज वेल’चे संस्थापक अध्यक्ष सुरेश येमूल यावेळी लहान ‘नंदीध्वज’ तयार करण्याचे विनामूल्य (नि:शुल्क) प्रशिक्षण देणार आहेत.

यावेळी विद्यार्थ्यांसह महिला, पालक इतर शाळेतील विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक राचप्पा मिराकोर, मुख्याध्यापिका अंबुबाई पोतू तसेच श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, दयानंद कोंडाबत्तीनी, उपाध्यक्ष नागेश पासकंटी, उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती, उपाध्यक्ष नागेश सरगम, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी आणि पद्मशाली सखी संघमच्या उपाध्यक्षा जमुना इंदापूरे, सहसचिवा ममता तलकोकूल, खजिनदार दर्शना सोमा, सहखजिनदार लक्ष्मी कोडम, कार्याध्यक्षा वरलक्ष्मी गोटीपामूल, समन्वयिका अरिता इप्पलपल्ली, समन्वयिका कला चन्नापट्टण, यांच्यासह सदस्या रजनी दुस्सा, भाग्यश्री पुंजाल, सुरेखा गोली, लता मुदगुंडी, आरती बंडी, सारिका वंगा, दिव्या रच्चा, पल्लवी संगा, प्रिती बंडी, जयंती बंडी, सुरेखा भिमनपल्ली, स्वरुपा बंडी, स्वाती इंदापूरे, लता बंडी, विजया बत्तुल, विशाखा सरगम, पद्मा उपलंची, प्रभावती दोरनाल, वंदना बंदगी, दुर्गा रेस, नर्मदा रेस, मुक्ता बल्ला, उमा शंकूर, कलावती येलदी, संगीता म्याकम, प्रतिभा दासरी, ममता बोलाबत्तीन, वज्रेश्वरी गाजूल, साधना बेत, प्रमिला चन्नापट्टण आदींनी केले आहेत.