मुलगा माझा साहेब झाला! या देखाव्याने कोतुळ मधे जपला सामाजिक वसा

कोतुळ प्रतिनिधी
मुलगा माझा साहेब झाला! या देखाव्याने कोतुळ ता अकोले येथे सार्वजनिक गणेश उत्सवात ओम साईराम मित्र मंडळाने सामाजिक वसा जपला आहे
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ओम साई राम मित्र मंडळ हे सांस्कृतिक परंपरा जपणारे मंडळ असून या मंडळांने यावर्षी मुलगा माझा साहेब झाला हा जिवंत देखावा सादर केला या देखाव्याचे उद्घाटन आजी-माजी सैनिकांच्या हस्ते करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.

कोतुळ येथील लष्करी सेवेतील आजी-माजी सैनिक 1) रामदास सर्जेराव देशमुख 2) सचिन मनोहर घोलप 3) दत्तात्रय भिकाजी गोंदके 4) रमेश बाळासाहेब देशमुख
5) सिद्धेश दिपक बोऱ्हाडे यांच्या हस्ते या जिवंत देखाव्याचे उद्घाटन करून मंडळांने देश सेवे प्रति आपली आगळी वेगळी निष्ठा या ठिकाणी दाखविली केली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोतूळ आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या देखाव्यासाठी गर्दी करीत आहेत. कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाचे कार्यकर्ते हा देखावा सादर करत आहे



