खिरविरे येथे अवैध दारू व्यवसायिकां चा दलित तरुणावर जीवघेणा हल्ला!आरोपी मोकाटच

आरोपींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा-पवार
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे येथे एका अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या इसमाने बाहेरून गावगुंड बोलावून तेथील एका दलित कुटुंबातील तेजस पराड यांच्यावर अमानुषपणे जीवघेणा हल्ला करून त्यांला जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी आरोपी मोकाट फिरत आहे सदर आरोपींवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी आरपीआयचे युवक तालुका अध्यक्ष विजयराव पवार यांनी केली आहे,
सदर दलित तरुणावर घोटी येथे एस एम बीटी रुग्णालयात वेळीच उपचार झाल्याने हा तरुण बचावला आहे मात्रकाळ सो कावू देणार नाही खिरविरे गावात अनेक दिवसांपासून राजरोसपणे अवैध दारू विक्री व्यवसाय चालत आहे हे व्यवसायीक कोणालाही न जुमानत नाही त्यांची दहशत वाढत आहे त्यांना विरोध केल्यास विरोध करणाऱयांना सम्पविण्याचा दम दिला जातो याला कोणाचे पाठबळ आहे याचा शोध लागला पाहीजे अवैध दारू विक्री तुन गुन्हेगारी वाढत आहे पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहे या दलित तरुणावर एवढा मोठा हल्ला होऊनही पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नाही
या अवैध दारू विक्रेत्यांने यापूर्वी अनेक जणांवर असे जीवघेणे हल्ले केले आहेत,तरी पोलिस प्रशासनाने त्याच्यावर गंभीर असे स्वरूपाचे गुन्हे दाखल केले नाहीत,त्या मुळे या बहाद्दराची अजूनच धटिंग शाही वाढली आहे,जर हे अतीशय जीवघेणे हल्ले करून देखील त्याच्यावर कोणत्या ही प्रकारची कारवाई होत नसेल तर पोलिस प्रशासन काय एखाद्या चा जीव गेल्या नंतर त्याच्या वर कारवाई करणार का?,का ते एखादी घटना घडण्याची वाट पाहतात काय?असा प्रश्न पडला आहे,
एवढी भयंकर घटना घडून देखील हे आरोपी अद्याप मोकाट फिरत आहे,यांच्यावर पोलिस प्रशासनाचा थोडा देखील वचक राहिला नसून या आरोपींना पोलिस प्रशासन पाठीशी घालत आहे,आरोपीना पाठीशी घातले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा
आर पी आय चे अकोले युवा तालुका अध्यक्ष विजयराव पवार यांनी दिला आहे