अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

संजय महाजन
पिंपळनेर येथील अनुदानित आश्रमशाळा सामोडे येथे महात्मा गांधी पुण्यतिथी व लालबहादूर शास्त्री जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमेश माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राचार्य मनेष माळी, शिक्षक पी.व्ही.जगताप,झेड.एम.गवळी होते.प्रथमता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रा.प्रविण पगारे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या विषयी माहिती दिली.उमेश माळी यांनी अध्यक्षीय मनोगतातून ” गांधी विचार व अहिंसा आणि परराष्ट्र -आजची स्थिती” यावर आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय ढोले यांनी तर आभारप्रदर्शन पी.डी.जगतापा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आर.एम.सोनवणे,प्रा.विजय ठाकरे,प्रा.वसंत गावीत, शिक्षक जी.बी.पवार, राकेश पगारे, गणेश पगारे, रितेश एखंडे,गणेश नेरकर,शरद सुर्यवंशी,शरद मोहिते, गणेश पगारे, श्रीमती छाया साखरे,प्रा.पोर्णिमा भामरे, आशालता लाडे, संगिता सोनवणे, यांच्या सह चतुर्थ कर्मचारी किरण नहिरे, भालचंद्र घरटे, पांडुरंग पगारे, आदी प्रयत्नशील होते.