इतर

काँग्रेस चे नेवासा तहसीलदारांना साकडे धान्यापासून वंचित रेशनकार्ड धारकाना तातडीने धान्य सुरु करा.

सोनई– प्रतिनिधि :

– धान्य पुरवठा पासून वंचित रेशनकार्ड धारक कुटुंबांना तातडीने धान्य पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नेवासा तालुका काँग्रेस कमिटीकडून निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मोठया प्रमाणावर असे कुटुंब आहेत की ज्यांच्याकडे रेशन कार्ड असुन देखिल त्या कुटुंबास रेशन मिळत नाही, यामध्ये प्रामुख्याने विभक्त रेशनकार्ड धारक असुन एकत्रित कुटुंब असताना रेशनकार्ड धारकास मूळ रेशन कार्डवर धान्य लाभ मिळत होता परंतु विभक्त होताच त्यास धान्य लाभ मिळत नाही. याशिवाय कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचं धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे परंतु कोरोणा महामारी समस्या नंतर हे कुटुंब परत गावी आले आहे त्यांच्याकडे रेशनकार्ड असूनही त्यांना धान्य मिळत नाही. तसेच लग्न झालेल्या मुलीचे नाव ऑनलाईन मध्ये समावेश होण्यास अडचणी येत आहे याशिवाय लहान मुलांचे नाव देखिल समावेश होण्यात अडचणी येत आहेत त्यामूळे हे सर्व घटक धान्य लाभापासून वंचित आहेत. नेवासा काँग्रेसने याची सखोल माहिती घेवुन व दखल घेऊन आज नेवासा येथे तहसिलदार रुपेशकुमार सुराणा यांची भेट घेऊन यावर चर्चा करून वंचित घटकासाठी धान्य पुरवठा सुरू करावा अशी मागणी केली. प्रशासनाने यावर तातडीने अमलबजाणी न केल्यास नेवासा तालुका काँग्रेस कमिटी वंचितासह तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन करून आक्रमक भूमिका घेईल असे स्पष्ट केले

. यावेळी नेवासा काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी माळवदे यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना आदेश देवून रेशनकार्ड संदर्भात एकत्रित ठराव घ्यावे अशी मागणी केली. याशिवाय आँनलाईन संदर्भात पुरवठा विभागाकडून वेळ न घालवता त्वरीत कार्यवाही करण्यात येणे गरजेचे असे स्पष्ट केले याशिवाय प्रत्येक गावातील वितरक दुकाना समोर अंत्योदय योजना व प्राधान्य योजनेत रेशनकार्ड धारकास प्रती व्यक्ती किती धान्य मिळते याचा मोठा फलक लावण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी नेवासा काँग्रेसचे सतिष तऱ्हाळ, संदीप मोटे, संजय होडगर, शहर काँग्रेसचे अंजुम पटेल, मुसा बागवान, अध्यक्ष रंजन जाधव, इम्रान पटेल, मुन्ना आतार, सचिन बोर्डे, शंकर शेंडगे, महीला काँग्रेसच्या अध्यक्ष शोभाताई पातारे, मीराताई वडागळे, शोभाताई बोरगे, ज्योती भोसले, शाम मोरे, सौरभ कसावणे आदीसह काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते.


सक्षम सेवा सोसायटीकडे धान्य दुकानं द्यावीत
नेवासा तालुक्यातील काही सेवा सहकारी सोसायटीकडे ना नफा ना तोटा या तत्वावर पूर्वी शासनकृत वाटप करण्यात आले आहे, तेव्हा सर्व गोरगरिबांना अल्प दरात धान्य मिळत होते,आता काही सोसायट्या सक्षम असून देखील खाजगी व्यक्ती कडे देण्यात आल्याची माहिती मिळाली असून संस्था अधिक सक्षम करण्यासाठी सेवा संस्थेकडे देण्यात यावी.

संभाजी माळवदे,अध्यक्ष, काँग्रेस पक्ष, नेवासा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button