पारनेर तहसील मधे होणारी नागरिकांची आर्थिक लूट थांबवा – अविनाश पवार

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील विविध गावांमधील सर्व सामान्य कुटुंबातील शेतकरी माणसाला रेशन कार्ड मधे नवीन नाव जोडनी साठी तसेच नाव दुरुस्तीसाठी आँनलाईन रेशन कार्ड करण्यासाठी विभक्त कुटुंबांमध्ये नविन रेशन कार्ड काढण्यासाठी आपल्या पारनेर तहसील कार्यालयात अडवीले जात आहे अधिकारी दाद देत नाहीत तसेच सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणावर अव्वाची सव्वा रक्कम घेऊन नागरिकांची लूट केली जाते तसेच पारनेर तहसील कार्यालयात कागदपत्रे दिली असता अधिकारी टाळाटाळ करीत उडवा उडविची उत्तरं देताना दिसतात मुजोर सेतु चालक दाखले काढण्यासाठी एजंट च्या माध्यमातून वेठीस धरतात मोठ मोठ्या रकमा वसूल करण्यात येतात सेतु कार्यालयात माहितीची सनद मोठ्या अक्षरात दर्शनी भागात लावने बंधनकारक असताना सुद्धा लावली जात नाही अशा सेतु चे परवाने रद्द करुन गुन्हा दाखल करायला हवा. सर्व सामान्य नागरिकांना गाव ते तहसील कार्यालय फेरे मारुन याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे तसेच एजंट च्या माध्यमातून अव्वाची सव्वा रक्कम घेऊन नागरिकांची लूट करीत फसवणूक होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे सर्व सामान्य गरीब नागरिकांना रेशन कार्ड नसल्यामुळे तसेच तृटी मुळे रेशन धान्यापासून वंचित रहावे लागत आहे सर्व सामान्य नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शाळकरी मुलांना दाखले काढण्यासाठी अडचणी येत आहेत. गोर गरीब कुटुंबातील जनता रेशन च्या धान्यापासून तसेच विविध योजनांच्या लाभापासून वंचित रहात आहे ही गंभीर बाब आहे त्यामुळे तहसीलदार यांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन रेशन कार्ड च्या संदर्भात तत्काळ उपाय योजना करुन तहसील कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करावी सर्व सामान्य शेतकरी, जेष्ठ नागरिक माणसाला तसेच शाळकरी मुलांना लवकरात लवकर त्वरित न्याय द्यावा अशी तहसीलदार यांना विनंती केली आहे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सर्व सामान्य शेतकरी बांधव गरिब गरजु नागरिकांच्या तसेच शाळकरी मुलांच्या न्याय हक्कासाठी पारनेर तहसील कार्यालयात कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता ठिय्या आंदोलन करण्याचा मनसे माथाडी कामगार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी इशारा दिला आहे.
पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी पारनेर तहसील कार्यालय जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मनसे सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के तसेच सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.