इतर
सांगवी गावचा तलाठी सापडेना!

अकोले प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील सांगवी गावात तलाठी कार्यालय शोभेची वस्तू बनली आहे तलाठ्याच्या मनमानीने शेतकरी हैराण झाले आहे आठवड्यातून फक्त तीन दिवस तलाठी महाशय हजेरी लावतात इतर दिवस मात्र दांडी मारतात यामुळे शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी वारंवार चकरा माराव्या लागतात तलाठी साहेब कधी येणार अशी विचारणा लोक आसपासच्या नागरिकांना करतात
तलाठी कार्यालयात तलाठी पूर्ण वेळ भेटत नाही कार्यालया बाहेर भेटीचा वार व संपर्क नंबर लिहिलेला नाही यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत सध्या शेती कामे व ऍडमिशन शाळा प्रवेश सुरू असल्याने दाखले उतारे आवश्यक आहे ते वेळेत मिळत नाही तलाठ्याची ही मनमानी कधी थांबणार? वरिष्ट लक्ष घालणार की नाही असा सवाल केला केला जात आहे
