कोतुळ ग्रामीण रुग्णालयात साजरा झाला आगळा वेगळा वाढदिवस !

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ श्रुती गोडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान करीत एक वेगळा आदर्श समोर ठेवला त्यांच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे
येथील कोतुळ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ श्रुती मधुकर गोडे यांचा काल वाढदिवस होता त्यांनी अतिशय साधेपणाने रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना केक भरवून आपला वाढदिवस रुग्णालयात साजरा केला हा वाढदिवस साजरा करताना त्यांनी एक सामाजिक बांधिलकी आणि समजा साठी एक वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी आपल्या स्वतःचे या दिवशी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाने त्यांचे सहकारी कर्मचारी यांनी देखील लगेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपणही या निमित्ताने रक्तदान करण्याचा निर्णय घेऊन रक्तदान केले

सध्या वाढदिवस साजरा करताना मोठा खर्च केला जातो मात्र तो साजरा करणे हे एक प्रतिष्ठेचे मानले जाते मात्र
सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी असे रक्तदानाचे महत्व व त्याचा संदेश निश्चितच इतरांना प्रेरणा देणारा आहे
अर्पण ब्लड बँकेचे प्रतिनिधी गणेश झोडगे यांनी यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांचे रक्तदान स्वीकारले
यावेळी डॉ कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान करत साधेपणाने वाढदिवस साजरा करत एक वेगळा आगळावेगळा आदर्श ठेवला शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे मात्र येथे अनेकांनी कौतुक केले अर्बन ब्लड बँकेचे प्रतिनिधी गणेश झोडगे यांनी येथील कर्मचाऱ्यांचे रक्तदान स्वीकारले यावेळीडॉ ऋषिकेश शिंदे, साहिल दिवेकर,
पलास बोर्डे ,अनिता बोर्डे ,विलास शिंदे, अन्सार काजी आदी सह कर्मचारी उपस्थित होते
