सोलापूरला महिलांना पद्मशाली सखी संघमच्या पदाधिकारी होण्याची विनामूल्य संधी…
सोलापूर : सोलापूर शहरात स्थायिक असलेल्या पद्मशाली समाजातील महिलांसाठी ‘पद्मशाली सखी संघम’च्या २०२४ – २५ या वर्षांकरिता पदाधिकारी आणि सदस्या होण्याची ‘विनामूल्य’ सुवर्ण संधी देण्यात येत आहे, अशी माहिती संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी दिले आहे.
पद्मशाली समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावे, त्यांचे कर्तृत्व आणि टॅलेंट व्यासपीठाच्या माध्यमातून समाजाला समजून यावेत या प्रांजळ हेतूने गेल्या दोन वर्षांपूर्वी श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’ची स्थापना करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षभरात विविध अनोखा सामाजिक राबवत वेगळेपणा आणि नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केले आहे, आणि यापुढेही केले जाईल. सन् २०२४ – २५ या वर्षांकरता नवीन पदाधिकारी व सदस्यांची निवड नि:शुल्क (मोफत) असून वर्षभरासाठी असेल सामाजिक उपक्रम फक्त रविवारीच घेण्यात येईल. नवीन पदाधिकारी व सदस्य आवर्जून उपस्थिती आवश्यक आहे. नांवनोंदणीसाठी सौ. ममता मुदगुंडी 9175988940 यांच्याशी संपर्क साधावेत किंवा त्यांच्या व्हाटस्अपवर लिहून पाठवावेत. नांवनोंदणीची अंतिम तारीख १४ जुलै पर्यंत आहे, याची नोंद घ्यावी.