आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०५/०४/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १५ शके १९४४
दिनांक :- ०५/०४/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १५:४६,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति १६:५२,
योग :- प्रीति समाप्ति ०७:५८,
करण :- बव समाप्ति २८:५१,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मीन – रेवती,
गुरुराशि :- कुंभ,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:३७ ते ०५:१० पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५९ ते १२:३२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:३२ ते ०२:०५ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३७ ते ०५:१० पर्यंत,
❀ दिन विशेष:-
विनायक चतुर्थी (अंगारक योग), गणपतीला दवणा व लाडूचा नैवेद्य समर्पणाच्या करणे, दग्ध १५:४६ नं., भद्रा १५:४६ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र १५ शके १९४४
दिनांक = ०५/०४/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
कौटुंबिक प्रश्न सुटतील. तुमचे व्यक्तिमत्व बहरेल. नोकरदार वर्गाला चांगला नफा मिळेल. आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावेत. तुमच्यातील उद्योगशीलता वाढेल.
वृषभ
घरात महिलांचे वर्चस्व वाढेल. अवाजवी कामे अंगावर घेऊ नयेत. मेहनतीला मागेपुढे पाहू नका. उधार उसनवारीचे व्यवहार करू नयेत. खर्च आटोक्यात ठेवावा.
मिथुन
बिनधास्तपणे वागणे ठेवाल. पत्नीच्या प्रेमळ सौख्यात भर पडेल. तरुण वर्गाशी संपर्क वाढेल. नियम बाह्य कामे करू नका. योग्य मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
कर्क
उत्तम वाहन सौख्य लाभेल. घरगुती कामे वेळेत पार पडतील. मनाजोगी खरेदी करता येईल. मित्र परिवारात वाढ होईल. मौल्यवान वस्तु लाभतील.
सिंह
कामानिमित्त प्रवास कराल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. दान धर्माचे पुण्य पदरी पडेल. स्पर्धकांवर मात करता येईल. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे.
कन्या
तब्येतीची काळजी घ्यावी. पित्त प्रकृतीत वाढ संभवते. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आध्यात्मिक अनुभूतीचा लाभ मिळेल.
तूळ
व्यावसायिक प्रवास करावा लागेल. स्वत:चेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मनात उगीचच हुरहूर वाटेल. मानपमानाचे प्रसंग येऊ शकतात. जोडीदाराशी विचार विनिमय करावा.
वृश्चिक
हित शत्रूंचा त्रास संभवतो. कामातील उत्साह वाढेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. स्वभावात काहीसा हटवादीपणा येईल. नवीन आव्हान पेलाल.
धनू
कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.
मकर
काही वेळ शांत राहणे उत्तम. फार उतावीळपणा करू नका. उष्णतेचे विकार संभवतात. कामातील उत्साह वाढीस लागेल. स्वत:च्या हिंमतीवर कामे पूर्ण कराल.
कुंभ
सामुदायिक वादात अडकू नका. काही कामे खिळून पडल्यासारखी वाटतील. प्रवासात काळजी घ्यावी. गैरसमजुतीतून त्रास संभवतो. हातापायांना किरकोळ इजा संभवते.
मीन
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मित्रांची नाराजी दूर करावी. तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल. व्यवहारी दृष्टीकोन ठेवाल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर