भारतीय स्टेट बँकेचा वर्धापन दिन कोतुळ शाखेत साजरा

कोतुळ प्रतिनिधी
भारतीय स्टेट बँकेच्या 69 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोतुळ (ता अकोले) येथील शाखेमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले
स्टेट बँकेच्या येथील शाखेत घेण्यात आलेल्या या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला स्टेट बँकेच्या अनेक ग्राहकांनी यावेळी रक्तदान करत स्टेट बँकेचा या स्थापना दिनाच्या आनंदात सहभाग घेतला संगमनेर येथील अर्बन रक्त केंद्र संगमनेर यांनी यावेळी रक्तदात्यांचे रक्त संकलन केले यावेळी बँकेचे शाखाधिकारी सुयोगकुमार सोनवणे कर्मचारी सखाराम कडाळी, गणेश आरोटे,गोल्ड व्हॅल्यूअर भागवत खोल्लम, अर्पण ब्लड सेंटर चे धनाजी माने , लक्ष्मी माळी, मयुरी भुतांबरे, अंजली लहुंडे,पूजा बांडेबूचे , बँकेचे खातेदार संजय आरोटे, संतोष काळे ,सुनिल गिते ,प्रकाश जंगम राजेंद्र घाटकर आदी उपस्थित होते
——-/-/—