पिंपळगाव खांड धरण भरले !मुळा धरणाकडे पाणी झेपावले!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरण अखेर भरले आहे बुधवारी पहाटे 5.30 वाजता धरण ओव्हर फ्लो होऊन मुळा पाण्याचा प्रवाह मुळा धरणाच्या दिशेनं झेपावला आहे
मुळा नदी पाणलोट क्षेत्रात काल मंगळवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता दिवसभराच्या संततधार पावसामुळे आदिवासी भागात सह्याद्री च्या डोंगरदऱ्या आता ओल्या चिंब झाल्या ओढे नाले सक्रिय झाल्याने मुळा नदीचा प्रवाह वाढला पिंपळगाव खांड धरणात मोठी आवक झाली आजही पावसाचे सातत्य टिकून आहे
600 दल घ फु क्षमतेचे पिंपळगाव खांड धरण ओव्हर फ्लो होऊन 1393 कुसेस चा विसर्ग मुळा धरणाकडे झपावणार आहे राहुरी तालुक्यातील 26 टी एमसी क्षमतेच्या मुळा धरणात आता आवक सुरू होणार आहे
मुळा नदी पाणलोट मध्ये अकोले तालुक्यातील आंबित धरणा नंतर आता पिंपळगाव खांड भरले यंदाच्या पावसाळ्यात अकोले तालुक्यातील हे दुसरे धरण भरले आहे मुळा नदी वाहती झाल्याने संगमनेर अकोले तालुक्यातील मुळा परिसरात आनंद व्यक्त होत आहे
