सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तन्मय पुंड यांची नेप्ती गावात मिरवणूक!

अहमदनगर /प्रतिनिधी
नगर तालुक्यातील नेप्ती येथील सामान्य कुटुंबातून आलेल्या व परिस्थितीवर मात करुन तन्मय बंडू पुंड सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गावातून त्याची मिरवणुक काढण्यात आली. सावता महाराज मंडळ, पुंड परिवार, द किंग ग्रुप ,समता परिषद व नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत गुलालाची उधळण करुन, पेढे वाटून ,फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष करण्यात आला. या आनंद सोहळ्यात सर्व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
नेप्ती येथील तन्मय पुंड याने नुकतीच सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल गावातील संत सावता महाराज मंदिरात समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले, माजी सरपंच अंबादास पुंड, प्रा. भाऊसाहेब पुंड व ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला. सजवलेल्या गाडीतून तन्मय पुंड याची आई-वडिलांसह मिरवणुक काढण्यात आली. ग्रामस्थांनी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब होळकर, सोमनाथ पुंड, दत्ता कदम, लक्ष्मण कांडेकर, डॉ. बंडू पुंड, शाहूराजे होले, रावसाहेब पुंड, सुरेश पुंड, आसाराम पुंड, रवी पुंड, सचीन पुंड, नितीन पुंड, अक्षय सप्रे, नितीन काळे, भानुदास फुले, निलेश पुंड, हरिभाऊ पुंड, राजेंद्र पुंड, संतोष पुंड, किरण पुंड, आदित्य पुंड, तुषार भुजबळ, दादाभाऊ फुले, विलास चौरे, सौरभ भुजबळ, राहुल भुजबळ, सागर शिंदे, राहुल भुजबळ, तेजस नेमाने, दिवानजी चौरे, गणेश राऊत, शिवाजी खामकर, पोपट मोरे, विष्णू गुंजाळ, डॉ.अभिषेक पुंड, सौरभ पुंड, ओंकार पुंड, संतोष बेल्हेकर, गणेश राऊत, शुभम शिंदे, मिलिंद फुले, अमोल कांडेकर आदींसह तन्मय पुंड मित्र परिवार, नातेवाईक व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना तन्मय पुंड म्हणाला की, ग्रामीण भागात सुरुवातीचे शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या सामान्य मुलाला सीए सारखी परीक्षेत यश मिळवणे सोपे नव्हते. मात्र वेळेचे योग्य नियोजन व ध्येय निश्चित करून यश प्राप्त करता आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर मिळवलेल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडिल व गुरुजनांना दिले.
महाविद्यालयीन शिक्षणा

नंतर त्याने सीए होण्यासाठी पुणे गाठले होते. तेथे राहून त्याने यश मिळवले आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण अहमदनगर मध्ये देसर्डा भंडारी अकॅडमीत आणि नंतरचे पुणे येथे झाले. त्याला स्वर्गीय सीए सागर साबळे, सीए मुकेश साळुंके, सीए हिम्मत देशमुख, सीए लाभेश रणसिंग यांचे मार्गदर्शन लाभले. तन्मयचे वडील बंडू पुंड हे पंचायत समितीत पशुधन पर्यवेक्षक म्हणून काम करत असून, सध्या ते सेवानिवृत्त झाले आहेत.आई सीमा पुंड गृहिणी आहे.
आपली बिकट परिस्थिती व आई-वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन तन्मय पुंड याने सीए होण्याची जिद्द मनाशी बाळगून घेतलेल्या कष्टाला यश आले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.