आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१३/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २२ शके १९४४
दिनांक :- १३/०९/२०२२,
वार :- भौमवासरे(मंगळवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति १०:३८,
नक्षत्र :- रेवती समाप्ति ०६:३६,
योग :- वृद्धि समाप्ति ०७:३६, ध्रुव ३०:१७,
करण :- बव समाप्ति २२:२६,
चंद्र राशि :- मीन,(०६:३६नं. मेष),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,(२१:१४नं. उत्तरा),
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. ११नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी ०३:२९ ते ०५:०१ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:२५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२५ ते ०१:५७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:२९ ते ०५:०१ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
अंगारक चतुर्थी (मुंबई चं.उ. २०:५१), चतुर्थी श्राद्ध, उत्तरा रवि २१:१४, वाहन गाढव, स्त्री.पु.सू.चं.,
अमृत ०६:३६ नं., घबाड १०:३८ नं. २१:१४ प., भद्रा १०:३८ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २२ शके १९४४
दिनांक = १३/०९/२०२२
वार = भौमवासरे(मंगळवार)
मेष
फसव्या आश्वासनांपासून दूर रहा. आत्मविश्वासाने कामे करा. अनेक दिवसांपासूनच्या अडचणी दूर होतील. आर्थिक बाजू सुधारेल. प्रवास लाभदायक ठरू शकतील.
वृषभ
कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. व्यावसायिक गोष्टीतील संभ्रम टाळावा. जीवनस्तर सुधारण्याचे योग. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. जोडीदाराला खुश कराल.
मिथुन
दिवस आपल्या मनासारखा जाईल. धडपड करून का होईना काम पूर्ण कराल. कामांना अपेक्षित गती येईल. शाश्वत प्रयत्न करत रहा. हातातील कामात निष्काळजीपणा करू नका.
कर्क
व्यावहारिक स्पष्टता ठेवावी. भावंडांची चिंता लागून राहील. करियर व वैयक्तिक चिंता सतावतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. समस्यांचे निराकरण करण्यात यश येईल.
सिंह
आपली ठाम मते मांडावीत. प्रसंगांना कणखरपणे सामोरे जा. व्यापारी वर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन वागावे. मंदी चिंता वाढवणारी असेल. नोकरदार वर्गाने आळस झटकून कामे करावीत.
कन्या
घरासाठी योग्य अशी खरेदी कराल. चिकाटी सोडू नका. दिवस धावपळीचा जाईल. मात्र त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक सदस्यांचा स्नेह वाढेल.
तूळ
कुटुंबासमवेत वेळ चांगला जाईल. कामातील क्षुल्लक समस्या सोडवू शकाल. विनाकारण मन चिंताग्रस्त राहील. आपले स्पर्धक त्रस्त करू शकतात. साहसाच्या जोरावर कामे पूर्ण कराल.
वृश्चिक
लोक तुमचा सल्ला मानतील. रखडलेल्या कामांना मार्गी लावायला जोर लावा. काहीसा मानसिक त्रास संभवतो. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ देऊ नका. नैराश्य टाळण्याचा प्रयत्न करा.
धनू
बोलण्यातून गैरसमज पसरवू नका. मानसिक अस्थिरता टाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. निष्काळजीपणा करू नका. आत्मविश्वासाने काम करा.
मकर
सामाजिक प्रतिष्ठा चांगली मिळेल. मित्रांशी मनमोकळ्या गप्पा होतील. अति अपेक्षा बाळगू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभनांना बळी पडू नका.
कुंभ
लोकांच्या बोलण्याची आपल्यावर भुरळ पडू शकते. कलेत मन रमेल. अधिकार्यांच्या सहकार्याचा वापर करून घ्या. वेळेचा सदुपयोग करावा. मेहनतीला पर्याय नाही.
मीन
दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. गुरु कृपेमुळे उन्नती साधता येईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हितशत्रूपासून सावध राहावे. मोठे व्यवहार आज टाळता आले तर पहा.
🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर