एमईटी स्कूलचे नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

दत्ता ठुबे/
पारनेर प्रतिनिधी
पारनेर येथे ७ जुलै रोजी पार पडलेल्या २४ वी नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत पारनेर तालुक्यातील सुपा येथील माऊली शिक्षण संस्थेच्या एमईटी इंग्लिश मिडीयम स्कूल व स्कायडेल इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत असे अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
तालुकास्तरीय पार पडलेल्या या स्पर्धेत अहमदनगर तसेच पुणे जिल्ह्यातून मिळून एकूण १८४० विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये एमईटी स्कूलमधील तब्बल ३४ विद्यार्थी टॉप १० मध्ये आले आहेत. अवघ्या पाच मिनिटांचा अवधी असलेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांनी अतिशय कौतुकास्पद यश संपादन केले आहे.
यामध्ये प्रणव गोरख गवळी,काव्या निखिल ठोकळ,
अरिहंत कळंबे, मोहम्मदनईम रियाज शेख,
शिरीष चहांडे, तनुष्का काळे, प्राप्ती नितीन दळवी, आदर्श नामदेव गवळी, शाहिस्ता समीर शेख, तक्षिल नितीन दळवी, सर्वज्ञ लामखडे, खुशी संतोष दरेकर, दक्ष प्रीतम पिपाडा, यशराज धनेश व्यवहारे, अनन्या विश्वास शिंदे, रुद्र भरत लाकूडझोडे, निर्मल नीरज कश्यप, रिधान अनिकेत पठारे, ओमकार राजेंद्र गवळी, त्रिवेणी राजेंद्र गवळी, आरोही अमोल भोसले, झेनाब रियाज शेख, रितिका संदीप गाढवे, संचित संतोष वाघ, रोहित विनायक मांडगे, अरझान असिफ पठाण,अनुजा शिवाजी रोकडे, तनुष्का विजय जरे, संचिता संतोष वाघ, रिशांक सचिन साठे, रोनित संदीप लोहाडे, साई विकास आटपाडकर, सृष्टी गाढवे, अनुष्का अडागळे आदी विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. या
सर्व विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट अब्याकस अकॅडमीच्या सौ. सुवर्णा ठोकळ मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अनिकेत पठारे, प्राचार्या मोनाली पठारे, उपप्राचार्या अनिथा शर्मा, शिक्षक गौरी पवार, संदीप गायकवाड, वैष्णवी रोकडे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे.