
संगमनेर दि 16 व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांना युवा ध्येय राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले आहे. गेली २५ वर्षे अरविंद गाडेकर हे व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनप्रबोधन करीत आहे. हस्यचित्रांच्या माध्यमातून त्यांनी दैनिकातून, मासिकांमधून, सोशल मीडियातून सर्वांना हसविले आहे. हसवता हसवता मार्मिक चिमटे काढीत व्यंगचित्रातून ते योग्य संदेश देत आहेत. अकरा हजार व्यंगचित्र साकारून झाली आहेत आणि या रेकॉर्डची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. युवा ध्येय समूहाकडून हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संगमनेर येथे आयोजित केला होता. महाराष्ट्रभरातून पुरस्कार्थी या सोहळ्यास उपस्थित होते. अरविंद गाडेकर यांचे सर्व स्थरातून
या पुरस्काराबद्दल अभिनंदन होत आहे.