भाविकांची मोफत नेत्र तपासणी करून अकोले रोटरी क्लब ची पांडुरंग चरणी सेवा

अकोले (प्रतिनिधी)-
प्रति पंढरी म्हणून समजल्या जाणाऱ्या इंदोरी (ता अकोले )येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या 171 भाविकांचे मोफत डोळे तपासून रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने पांडुरंग चरणी सेवा रुजू करण्यात आली.
यावेळी 171 भाविकांपैकी 20 जणांना मोतीबिंदू ऑपरेशन साठी सुचविलेले आहे व किरकोळ इन्फेक्शन असलेल्या रुग्णांना अकोले येथील रोटरी नेत्र( डोळे) तपासणी केंद्रामध्ये पुढील उपचारासाठी बोलवले आहे.
रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे वतीने अंध मुक्त गाव अभियान हाती घेतले असून त्याचा शुभारंभ श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट व रोटरी आय केअर हॉस्पिटल संगमनेर यांच्या विशेष सहकार्याने आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरी असलेल्या इंदोरी येथे पांडूरंगाचे दर्शन घेण्यासाठी तालुक्यातून येणाऱ्या हजारो भाविक भक्तांसाठी मोफत नेत्र(डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री विठ्ठल रुख्मिनी देवस्थान ट्रस्ट इंदोरीचे उपाध्यक्ष संतोष नवले, सेक्रेटरी अशोकराव धुमाळ,सह सचिव शांताराम नवले,खजिनदार सतीश नवले, विश्वस्त पांडुरंग नवले,रामनाथ पा. हासे,जेष्ठ विधिज्ञ आर.डी.नवले,रवींद्र देशमुख, सचिन जोशी,संतू नवले,तुळशीराम नवले,सुहास नवले, अमोल वाकचौरे,संदीप ठोंबाडे, पोलीस पाटील अशोकराव नवले ग्रामपंचायत इंदोरी च्या उपसरपंच सौ. मनीषा ठोंबाडे,सदस्य वैभव नवले,निखिल नवले,प्रवीण नवले,कैलास देशमुख,सौ.कमल थोरात,सौ वर्षा शिरसाट,सौ .रुपाली धुमाळ,ग्रामसेवक एस डी गोडे, कर्मचारी किरण नवले,संदेश नवले, शिवाजीराव हासे, विद्याधर आग्रे,प्रा.गणपत नवले, डॉ गणेश नवले, प्रकाश नवले, संतोष लोहटे ,अशोकराव कडलग,

भगवान नवले,केशवराव नवले,विकासराव देशमुख, भाऊराव धुमाळ,रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते,सेक्रेटरी अमोल देशमुख, संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य,माजी अध्यक्ष सचीन देशमुख, सचिन शेटे,सुनील नवले,अरुण सावंत,संदीप मालुंजकर,प्रा.डॉ.संजय ताकटे,संदीप शेणकर,राजेंद्र मालुंजकर आणि नेत्र तपासणी शिबिरासाठी रोटरी आय केअर हॉस्पिटल संगमनेर चे प्रतिनिधी डॉ.सोनाली मेंगजी,
डॉ. रोहित शिंदे,शिबिर सहाय्यक संदीप घुले,कौन्सिलर अमोल गुंजाळ, चालक बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.यावेळी नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.