महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या महिलाश्रमात आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात साजरी!

पुणे दि 17 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आज दिनांक १७जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

युवा कीर्तनकार कुमारी युगंधरा मंदार पाध्ये हिने भक्ती या विषयावर कीर्तनाचे निरुपण केले. यावेळी वसतिगृहातील ११०० मुली कीर्तनात अतिशय भारावून गेल्या.
युगंधरा पाध्ये हिने तुकाराम महाराजांचा भक्ती पाशी देव घालीतशी उडी हा अभंग घेऊन भक्ती विषयी निरूपण केले.

यामध्ये तिने वेगवेगळी उदाहरणे दिली देव म्हणजे काय? तो कोठे असतो.. देव म्हणजे ऊर्जा चैतन्य भगवंत म्हणजे सगळे गुण अवगत असणारा असा त्याग, शौर्य
धैर्य, पराक्रम, सौंदर्य, भक्ती, समाजाचे कल्याण धडपड करणारा इत्यादी गुण ज्याच्यामध्ये असते. तो देव सगळ्यांमध्ये असतो.
हरिभक्त दामाजीपंत यांची पंढरीची वारी विठ्ठल भेटीचे वर्णन मानव सेवा हीच ईश्वर सेवा संतांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये कोणाचे वाईट करू नये, आपले कर्म चांगले असेल तर संकटातही देव आपल्याला मार्ग दाखवतो अशी अनेक उदाहरणे देऊन भक्ती विषयी निरुपण केले.

वसतिगृहातील विद्यार्थिनी अमृता दौंडकर हिने सूत्रसंचालन व परीचय करुन दिला रुख्मिणी बागूल यांनी प्रास्तविक केले व दिव्या साबळे हिने आभार मानले.
यावेळी वसतिगृहप्रमुख सुमन तांबे यादव, उपप्रमुख पूनम पोटफडे, केसवर्कर कांचन फाळके तसेच अशा ढालकरी, राजश्री मुंडलिक , सोनाली कोंढरे मानसी दर्भे अनिता महाजन तसेच सर्व वसतिगृह स्टाफ उपस्थित होता.