कळस कीर्तिचा ‘ पुस्तकाचे अगस्ती महाविद्यालयात प्रकाशन

अकोले प्रतिनिधी
अगस्ती महाविद्यालयात महात्मा फुले , डॉ . आंबेडकर , राजर्षि शाहू महाराज संयुक्त जयंती अभिवादन सोहळ्यानिमित्त प्राचार्य डॉ . भास्कर शेळके आणि डॉ . सुनील शिंदे यांच्या ‘ कळस कीर्तिचा ‘ या लेखसंग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले .
गाथा कॉग्निशन प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित या पुस्तकात प्राचार्य डॉ . शेळके यांचे गाडगेबाबा , डॉ . आंबेडकर , कर्मवीर जगदाळे , भाऊराव पाटील यांच्यासह अन्य सुधारकांवरील लेख तसेच डॉ शिंदे यांनी वसंत बापट , डॉ . सु . रा . चुनेकर , डॉ . गंगाधर मोरजे , प्रा . पद्मा मोरजे , वसंत दावतर , स्वातंत्र्य सेनानी पी . जी . भांगरे यांच्यासह अन्य शिक्षण तज्ञ , साहित्यिकांच्या कार्याचा परामर्श घेतलेल्या लेखांचा समावेश आहे .
सामाजिक , शैक्षणिक , साहित्य – संशोधकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तित्व आणि सुधारकांच्या कार्यकर्तृत्वाचा समावेशक वेध घेतलेल्या या पुस्तकात डॉ . शिंदे यांचे वेळोवेळी प्रसारमाध्यमांत प्रकाशित झालेले लेख समाविष्ट आहेत .
अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर , उपाध्यक्ष विठ्ठल चासकर , सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत आणि हस्ते हे प्रकाशन करण्यात आले . याप्रसंगी प्रा . वर्षा काकड आणि डॉ . रंजना कदम यांची महात्मा फुले , डॉ . आंबेडकर , राजर्षी शाहू यांच्या कार्याचा मागोवा घेणारी व्याख्याने झाली .
‘ कळस कीर्तिचा ‘ पुस्तकाचे लेखक प्राचार्य डॉ . भास्कर शेळके , डॉ . सुनील शिंदे , प्रकाशक डॉ . कल्पना नेहेरे – भगत , सुजाता ऑफसेटचे सचिन नवले तसेच प्रा . वर्षा काकड , प्रा . रंजना कदम यांचा सत्कार करण्यात आला . संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल चासकर यांनी मनोगत व्यक्त केले . प्राचार्य डॉ . भास्कर शेळके यांनी प्रास्ताविकात पुस्तकाची वैशिष्ट्ये कथन केली .
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ . संजय ताकटे , प्रा . बी . एच् . पळसकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी उपस्थित होते .
डॉ . शिवाजी खेमनर यांनी आभार व्यक्त केले . डॉ . साहेबराव गायकवाड आणि प्रा . महेजबीन सय्यद यांनी सूत्रसंचालन केले .
———————————————–