अहमदनगर-भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकांने दिल आहे.
नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. देशातील लोकसभा निवडणूकीचा एकंदरीत कल पाहता. यात महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक हे संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली. केंद्रामध्ये जरी एनडीएचे सरकार स्थापन झाले. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठी ताकद दाखवून दिली. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये लक्ष वेधून घेणारा ठरला. नगर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ म्हणून समजले जाणारे विखे कुटुंबातून डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली. या निवडणूकीत निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा तब्बल २९ हजार ३१७ मतांनी पराभव केला. परंतु आता या झालेल्या पराभवानंतर मात्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी मात्र ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. आता सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. असे वृत्त एका इंग्रजी दैनिकांने दिले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला आहे. यात जवळपास १० उमेदवारांचा समावेश आहे. या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅड मशीनची चौकशीची मागणी केलेली आहे. इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे एकूण १० अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यातील बहुतेक उमेदवारांनी एक ते तीन ईव्हीएम युनिटची पडताळणी करावी, अशी मागणी केलेली आहे. परंतु काहींनी मात्र यापेक्षा जास्त युनिटची चौकशी करावी,अशा पद्धतीने मागणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीन करिता ४० हजार रुपये आणि त्यावर १८ टक्के जीएसटी भरावी लागणार आहे. सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.