पिंपळदरी आश्रम शाळेला सोलर वॉटर प्युरिफायर ची भेट!

अकोले प्रतिनिधी
पिंपळदरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत पुणे येथील बीइंग व्हॅलेंटियर या सेवाभावी संस्थेच्या वतीने पाच लक्ष रुपये किमतीचे सोलर वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले
याप्रसंगी बीइंग व्हॅलेंटियर, या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कैलास नरवडे यांनी आमची संस्था पर्यावरण व आरोग्य या क्षेत्रामध्ये काम करत असून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यास मिळावे व त्यांचे आरोग्य सदृढ राहावे या हेतूने आम्ही वॉटर प्युरिफायर आश्रम शाळेस भेट दिला आहे.
यावेळी अक्षरभारतीचे संघटक भानुदास आभाळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून आश्रम शाळेच्या ग्रंथालयास 501 पुस्तके भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

याप्रसंगी संस्थेचे बाळासाहेब नेहे,घनश्याम पाटील, भूषण हरवाळकर ,भाऊसाहेब कासार तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनंजय मलाव यांच्यासह राधेश्याम जगधने, मंदा घुले,शंकर कडाळे, संगीता आंबरे , शितल गिरी ,दीपक कदम हे शिक्षक व मंगेश निकम, प्रमोद कोल्हे ,बाबासाहेब नरळे,दत्तात्रय जाधव ,मारूती कुदळे,विजय यादव ,लक्ष्मण खंडागळे हे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील शेळके यांनी केले.तर सूत्रसंचालन व आभार विजय सहाणे यांनी मानले.
