रोटरी क्लब ऑफ नासिक आणि नामको हॉस्पिटलचे वतीने अंबड येथे आरोग्य तपासणी शिबिर .

नाशिक दि 28
रोटरी क्लब ऑफ नासिक आणि नामको हॉस्पिटल ह्यांच्या सांयुक्त विद्यमाने ग्लोबल व्हिजन स्कूल अंबड येथे आरोग्य तपासणी शिबिर दिनांक 24 आणि 25 जुलै ला आयोजित करण्यात आला .
ह्या शाळेत अंबड येथील गरीब कामगारांची मुले शिक्षण घेत आहेत.त्यांना अरोग्य विषयी माहिती देण्यात आली तसेच उंची , वजन, रक्तदाब ,रक्तातील साखर ,ऑक्सिजन ची पातळी आणि डोळे ह्या सगळ्या तपासण्या मुलांबरोबर शिक्षकांच्या ही करण्यात आल्या .
426 विध्यार्थी आणि 48 शिक्षक व सहकारी ह्यांना तपासणी चा लाभ घेता आला .
मुलांनी उत्तम आहार आणि नियमित व्यायाम यावर भर द्यावा असे रोटरी क्लब ऑफ नासिक चे अध्यक्ष्य रोटे ओमप्रकाश रावत ह्यांनी मुलांना मार्गदर्शन केले .रोटरी क्लब ऑफ नासिक गेल्या ८० वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात सामाजिक ,शैक्षणिक,आरोगय विषयक उपक्रम राबविते ह्याविषयी रोटे मकरंद चिंधडे ह्यानी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ह्या शिबिराला रोटरीचे सचिव शिल्पा पारख ,मेडिकल डायरेक्टर मकरंद चिंधडे आणि रोटेरिअन आदेश डाडावाला उपस्तित होते . नामको हॉस्पिटल चे सचिव शशिकांत पारख व त्यांची संपूर्ण टीम ह्यांनी आरोग्य तपासणीसाठी संपूर्ण सहकार्य केले
तसेच सौ. सबिया शेख आणि ग्लोबल व्हिजन स्कूलच्या सर्व शिक्षकांच्या मदतीने हे शिबीर यशस्वी झाले.