परकीय भाषेतून आलेले शब्द कोणत्याही भाषेला समृध्दच बनवतात- डाॕ. शशिकला राॕय

डाॕ.डी.वाय पाटील महाविद्यालयात,हिंदी भाषा सप्ताह साजरा
आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डीच्या हिंदी विभागाकडून १४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंदी दिवसाच्या अनुषंगाने हिंदी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रोफेसर डाॕ. शशिकला राॕय यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.
हिंदी भाषा सप्ताह अंतर्गत वक्तृत्व, सुलेखन, निबंध, पोस्टर, काव्यवाचन अशा अनेक स्पर्धेचे व डाॕ. शशिकला राय यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. तसेच परकीय भाषेतून येणारे शब्दांनी भाषा समृध्द होत असते, तसे हिंदी भाषेतही अनेक परकीय भाषेतून शब्द आलेले आहेत. यामुळे भाषेवर फार मोठा परिणाम होतो असे नाही, तर भाषेचाच शब्दसंग्रह वाढून भाषासमृध्दच होते. परकीय भाषेतून हिंदीत आलेले शब्द आज आपल्या एवढे अंगवळनी पडले आहेत की आपण त्यांनाच मूळ हिंदीचेच शब्द मानतो अशा शब्दांची अनेक उदाहरणेही दिली. आपण दुसऱ्याच्या भाषेचा आदर केला तर दुसरा आपल्या भाषेचा आदर करेल असे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी पाहुण्याचे स्वागत आणि परिचय करू देताना हिंदी साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील डाॕ. राय यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सांगितले. तसेच भाषा हे संप्रेषनाचे माध्यम आहे. कोणती भाषा श्रेष्ठ व तुच्छ नसते असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रास्तविकात प्रा. राजेश भगत यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगतानाच हिंदी भाषा सप्ताह आयोजनाचा हेतू व उद्देश सांगितला. या सप्ताहनिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन यावेळी गौरवविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. त्रिवेणी जाधव यांनी केले. तर आभार प्रा.डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष डाॕ. पी.डी.पाटील साहेब, उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
