टाकळी ढोकेश्वर येथे साई आस्था चॅरिटेबल डोळ्यांच्या दवाखान्याचे उद्घाटन

ग्रामीण भागात साई सावली हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम सेवा : डॉ. सतीश सोनवणे
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली प्रतिष्ठान संचलित कै. डॉ राजेश खांदवे नेत्ररोग तज्ञ यांच्या स्मृती प्रित्यर्थ साई आस्था चॅरिटेबल डोळ्यांचा दवाखान्याचे उदघाटन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त मा. सीताराम खिलारी सर त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ मॅक्स केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश सोनवणे , तसेच साई दीप हॉस्पिटलचे फिजिशियन तसेच संचालक डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ भाऊसाहेब खिलारी, डॉ स्वाती खिलारी, डॉ विजय पुरी, डॉ. प्रदीप दाते, डॉ अश्विन खंदारे, डॉ. चैत्राली सोमाणी, डॉ. गणेश सारडा, श्रावण गायकवाड, यांच्या उपस्थितीत संपन्न झाले
. यावेळी डॉ. सतीश सोनवणे म्हणाले की, साई सावली हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू होत असलेला ग्रामीण भागातील पहिला डोळ्यांचा दवाखाना आहे. टाकळी ढोकेश्वर व परिसरातील तसेच दुर्गम भागातील जनतेची लोकसंख्या पाहता रुग्णांना याचा फायदा होईल. तसेच या ठिकाणी सुरू होत असलेल्या सुविधा कॉम्पुटर द्वारे डोळ्यांची तपासणी, डोळ्यांचा मास काढणे, डोळ्यांच्या मागील भागाचे रेटिनालचे निदान व उपचार, मोतीबिंदू काचबिंदू निदान व उपचार , डोळ्यांची शस्रक्रिया, मोतीबिंदू शास्रक्रिया, लहानमुलांचे नेत्रविकार, उपचार या सर्व आजाराचे निदान या ठिकाणी होणार असून याचा लाभ सर्व रुग्णांनी घ्यावा असे यावेळी ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की साई सावली हॉस्पिटल ने कोरोना काळात केलेली उल्लेखनीय कामगिरी ही कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील सर्व सेवासुविधा पूर्ण असलेले हे ग्रामीण भागातील एकमेव हॉस्पिटल आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधा सह सर्व ऑपरेशन अत्यंत कमी दरात केल्या जातात. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद वाक्य समोर ठेऊन चाललेल्या या हॉस्पिटल चे चेअरमन डॉ. भाऊसाहेब खिलारी व सर्व संचालकांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
यावेळी ११० रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला नितीन आंधळे, सुरज आरंगळे, प्रा. सुशांत शिंदे, प्रा. नामदेव वाळुंज, प्रसाद सोनावळे, जयेश झावरे , रोहिणी नरवडे, डॉ ज्योती गुंड, गणेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साई सावली हॉस्पिटल तसेच सावली स्कूल ऑफ नर्सिंग चे सर्व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.