कर्मवीरांच्या आदर्शातून लाखो विद्यार्थी घडले – सुरेशराव कोते

“”””””””””””””””””
कोतुळ प्रतिनिधी
कर्मवीरांच्या आदर्शातून लाखो विद्यार्थी घडले असे प्रतिपादन महिला गृह उद्योग लिज्जत पापड उद्योग समूहाचे मुख्य कार्यकरी अधिकारी सुरेशराव कोते यांनी केले
अकोले तालुक्यातील कोतुळ येथील कोतुळेश्वर विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंती कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून ते बोलत होते

ते पुढे म्हणाले की कर्मवीरांच्या आदर्शतून लाखो विद्यार्थी घडले आपल्याला कर्मवीर अण्णा नाही होता आले तरी चालेल पण अन्नांपेक्षा कमी होऊ नका काम करत राहिलें की यश मिळत राहते मी रयत चा विद्यार्थी आहे याचा मला आभिमान आहे पुस्तकी ज्ञान बरोबरच व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे मंत्री , शास्त्रज्ञ वर्गात कधी पहिले आले नाही तरी त्यांनी नाव कमवले
माणसे वाचण्याची क्षमता वाढीला लावा सवयीचं गुलाम न होता जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसं वाचता आले पाहिजे असे श्रीं सुरेशराव कोते यांनी यावेळी सांगितले

आयुष्यात वेळेला महत्व दिले पाहिजे शिक्षणाने नाव आणि नवी ओळख तयार होते मोबाईल मध्ये किती वेळ जातो समजत नाही त्याचा अतिरेक नको त्याचा योग्य वापर केला पाहिजे शिक्षणाबरोबर खेळाचे मैदानात वेळ खर्च झाला पाहिजे बौद्धिक व शारीरिक संपत्ती या दोन्ही गोष्टी महत्वा च्या आहे इंग्रजी भाषे बरोबर मराठी मातृभाषा ही तेवढीच गरजेची आहे असे पुणे येथील शरद सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र देशमुख यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले
पर्यवेक्षक श्री पाळंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर शिक्षक श्री इरणक यांनी स्वागत केले
याप्रसंगी शाळेतील विविध स्पर्धामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सीताराम देशमुख ,सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र देशमुख , शिक्षक श्री गोडे यांनी मनोगत व्यक्त केले

उपसरपंच संजय देशमुख राजेंद्र पाटील देशमुख , मनोज देशमुख ,हेमंत देशमुख,गणेश घोलप राधाकृष्ण गोडसे महाराज पत्रकार सुनील गीते,देवानंद पोखरकर सोमदास पवार ,अनिल देशमुख ,रामनाथ कोकणे ,सुभाष देशमुख सतीश देशमुख पंकज देशमुख गुरुदत्त सोनावळे आदी सह ग्रामस्थ पालक शिक्षक विद्यार्धी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी डी कवडे यांनी केले तर भागवत देशमुख यांनी आभार मानले