
अकोले प्रतिनिधी
दुधाला 40 रूपये भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या इतर मागण्या साठी सुरू असलेल्या कोतुळ (ता अकोले जिल्हा अहमदनगर) येथील आंदोलकांच्या भेटीला राज्याचे दुग्ध उपायुक्त उद्या येत आहे
आंदोलनाच्या 33 व्या दिवशी कोतुळ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर चौथी बैठक कोतुळ येथील आंदोलनाच्या मंडपात उद्या दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी ठीक 1 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी राज्याचे दुग्धायुक्त श्री. मोहोड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त, इतिवृत्तातील अपूर्ण राहिलेल्या बाबींवर संघटनेने सुचविलेल्या सुधारणा व त्या पार्श्वभूमीवर घेतलेले निर्णय, दूध दराबाबत व वजनकाटे, मिल्कोमीटर, भेसळ, पशुखाद्याचे दर, आदी बाबत करावयाच्या कायद्याच्या प्रारूपाची प्रक्रिया, 3.2/8.3 गुणवत्तेच्या आतील दुधाला लागू करण्यात आलेला डीडक्शन दर आदी प्रश्नांच्या बद्दल
राज्याचे दुग्ध उपायुक्त श्री. हेमंत गडवे/ श्री. गजानन तावडे व
जिल्हा दुग्धविकास अधिकारी श्री. सोनूणे आदींबरोबर
उद्या दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी चर्चेची चौथी फेरी पार पडत आहे.
या बैठकीत काय निर्णय होतो या कडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे आंदोलकां च्या मागण्या पूर्ण होत्या की नाही का आंदोलन सुरुच राहणार या बाबत उद्या च्या बैठकी नंतर नक्की होणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले
——-