जायनावाडी येथे पारंपारिक पद्धतीने होळी उत्सव संपन्न.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील महाकाळ्याच्या पायथ्याशी असलेले जायनावाडी एक छोटेसे गाव या गावात सालाबादप्रमाणे याही वर्षी होळी उत्सव साजरा झाला.
पारंपारिक नियमानुसार दोन दिवशी होळी सण साजरा होतो .आदल्या दिवशी लहान होळी व दुसऱ्या दिवशी मोठी वेळी असे संबोधले जाते.
होळीची संबंधित एक आख्यायिका राजा हिरण्यकशिपू भगवान विष्णूचे अनुयायी असलेला त्याचा मुलगा प्रल्हाद आणि त्याचे मावशी होलिका या राक्षसाची कथा सांगते.
भारतीय पौराणिक कथांनुसार हिरण्यकश्यपूला एक वरदान देण्यात आले होते.ज्यामुळे मनुष्य आणि प्राणी दोघांनाही त्यांचा वध करण्यापासून रोखले गेले होते. म्हणून त्याने त्यांना त्याची पूजा करायला लावली.परंतु हिरण्यकश्यपुने आपली बहीण होलीकाला मुलगा भगवान विष्णूचा अनुयायी बनवून त्याची पूजा करण्यास नकार दिल्यानंतर आगीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी चितेवर बसून स्वतःला वस्त्राने झाकून आपल्या मुलाला ठार मारण्यास सांगितले. पण त्याचे रक्षण करण्यासाठी प्रल्हादाने भगवान विष्णूची प्रार्थना केली.त्यांनी होलिकाचे वस्त्र वाहून नेणारा वाऱ्याचा झोत आपल्याकडे पाठवून प्रतिसाद दिला.म्हणूनच होळीच्या आदल्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याच्या स्मरणार्थ होलीका दहन साजरा केला जातो.
प्रत्येक घरातील स्त्री ही परंपरेनुसार पुरणपोळीचा एक गाठी,खोबऱ्याची वाटी,याचा नैवेद्य दाखवतात.होळीच्या भोवताने पाच फेऱ्या मारतात. आपल्या काही मनोकामना प्रार्थना होळीच्या दिवशी अर्पण करतात.होळी हा सण शिमगा धुलीवंदन वर्षातील मोठा सण म्हणून साजरा करतात.आपल्या रूढी परंपरेनुसार ढोल ताशाच्या गजरात होळी खांबाची मिरवणूक काढतात वाजत गाजत गावातील तरुण मंडळी हे होळीचा खांब अगदी थाटामाटात वाजवीत गावातून आणतात. सर्व बाळ गोपाळ महिला या होळी सणाचा आनंद घेतात.होळीही दोन दिवस राखली जाते गावातील जुनी लोक पारंपारिक नृत्य साजरे करतात.