अहमदनगर
मुळा कारखान्याच्या मिल रोलर चे आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते पूजन.

सोनई :-[ विजय खंडागळे]
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 -23 या गळीत हंगामासाठी कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री आमदार शंकराव गडाख पाटील यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन सोमवारी संपन्न झाले. कार्यक्रमापूर्वी संचालक बाळासाहेब बनकर व नारायण लोखंडे यांच्या हस्ते मिल रोलरचा विधिवत पूजाविधी करण्यात आला. यंदाचा हंगाम १ ऑक्टोबर, २०२२ पासून सुरू करण्याच्या दृष्टीने बंद हंगामात करावयाची मेंटेनन्सची व रिपेरिंगची कामे वेळेत व व्यवस्थित करण्याचे आवाहनही आमदार गडाख यांनी यावेळी कामगार व अधिकाऱ्यांना उद्देशून केले. कारखाना सुरुवातीपासून विना स्टॉपेजेस व गाळपाच्या रेटमध्ये सातत्य राखून चालेल यादृष्टीने काळजीपूर्वक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे चेअरमन नानासाहेब तुवर, व्हाईस चेअरमन कडूबाळ कर्डिले, भाऊसाहेब मोटे, बापुतात्या शेटे, संजय जंगले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व कारखान्याचे सर्व संचालक त्याचबरोबर मुळा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था, सोनई (मुळा बाजार) या संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन मदनराव डोळे व नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन ऋषिकेश काळे आणि बाजारचे सर्व संचालक उपस्थित होते.
*मागील हंगामात कारखान्याने 15 लाख 32 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले. याही हंगामात गाळपाचे तेव्हढेच उद्दिष्ट असून कारखान्यावर तालुक्यातील सभासद, ऊस उत्पादक यांचा असलेला विश्वास कायम राहील यासाठी संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी काम करतील--माजी मंत्री शंकरराव गडाख*
कार्यक्रमासाठी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार युनियनचे सचिव डी एम निमसे यांनी केले.
